आणखीकोकणवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

ऑडिटच्या नावाखाली कागदपत्रे तपासणीसाठी हॉटेलमध्ये नेली, म्हापण ग्रामपंचायतीमधील प्रकार…

🛑ग्रामपंचायत सदस्यांनी केली पोलिसात तक्रार

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले : दि. १२

तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायतमधील महत्त्वाची कागदपत्रे ऑडिट करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण गावातील खाजगी हॉटेल मध्ये अनधिकृत रित्या घेऊन गेले होते. याबाबत गावचे सरपंच, विद्यमान ग्रामसेवक यांना कोणतीही कल्पना न देता हा गैरकारभार सुरू असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी यांना समजताच त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन हा प्रकार रोखला आणि चव्हाण यांना धारेवर धरले. तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रकरणी रीतसर तक्रार निवती पोलीस ठाण्यात दिली असून चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

म्हापण ग्रामपंचायतीमध्ये काही जुनी कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सदस्य गेले होते. कार्यालयात चौकशी केली असता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यां कडून ऑडिट चालू आहे असे समजले, परंतु ग्रामपंचायत कार्यालयात कोणीही ऑडिटर नाहीत. काहीतरी गडबड असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले म्हणून माहिती घेतली असता ग्रामपंचायतचे ऑडिट हे कार्यालयात न करता गावातील सिद्धी गेस्ट हाऊस (लॉजिंग बोर्डिंग) येथे चालू असल्याचे समजले. तत्काळ ग्रामपंचायत सदस्य संजोग अंकुश परब, संदीप ज्ञानदेव खोत, गुरुप्रसाद भगवान चव्हाण यांनी पंचायत समिती सदस्य गौरवी मडवळ, माजी सभापती विकास जर गवंडे तसेच विजय ठाकूर, जगदीश म्हापणकर, चंद्रकांत चव्हाण, नाथा मडवळ यांच्या सह सदर हॉटेल येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर ठिकाणी म्हापण ग्रामपंचायतीची कागदपत्रे, रेकॉर्ड हे तत्कालीन ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण हे रेकॉर्ड सहित हॉटेलच्या वरील मजल्यावर चाळत असल्याचे दिसून आले.

सदर ठिकाणी इतर कोणीही आढूळून आलेले नाहीत. काही वेळानंतर ऑडिटर तेथे आले त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर रेकॉर्ड कोणी आणले याची कोणतीही कल्पना आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बाप ही गंभीर स्वरूपाची असून ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण यापूर्वी म्हापण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते. त्यामुळे चव्हाण यांनी ऑडिट करिता कर्मचाऱ्यां मार्फत बेकायदेशीर रित्या ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड येथील सिद्धी गेस्ट हाऊस लॉजिंग बोर्डिंग मध्ये अनधिकृतपणे आणलेले आहे, हे समजताच सर्वांनी चव्हाण यांना धारेवर धरले.

याबाबत विद्यमान सरपंच, ग्रामविकास अधिकारी हळदणकर यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनीही आपल्याला काही माहीत नाही किंवा आपली परवांगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तसेच निवती पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दिली आहे. निवती पोलीस अधिकारी श्री. वारंग, कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!