हेल्प फोंडेशन,उमा इन्सीट्यूटतफॅ आशा सेविकांचा सत्कार
_*🛑 हेल्प फोंडेशन,उमा इन्सीट्यूटतफॅ आशा सेविकांचा सत्कार*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-११ :-* कोरोना काळात आशासेविकांनी तळागाळात फार मोठे काम केले आहे व त्यामुळेच या काळामध्ये अनेक रुग्ण बरे झालेले आहेत. मात्र दुर्देवाने आशा सेविकांच्या या कामाची दखल पाहिजे तेवढी घेतली गेली नाही हेही तेवढेच खरे आहे.परंतु हेल्प फाउंडेशन हे आशा सेविकांच्या प्रश्नासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याबरोबर सातत्याने राहील अशी ग्वाही हेल्प फाउंडेशन चिपळूणचे अध्यक्ष सतीश कदम यांनी खेर्डी ग्रामंपचायंत येथे पार पडलेल्या आशा सेविकांच्या सत्कार कार्यक्रमात दिली.
या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते, तसेच आशा सेविकागटप्रवर्तक श्रद्धा जाधव,उमा इन्सीट्यूटच्या अध्यक्षा उमा म्हाडदळकर,हेल्प फोंडेशन उपाध्यक्षा अंजली कदम आदी उपस्थित होत्या.हेल्प फाऊंडेशन चिपळूण तसेच उमा फॅशन इन्स्टिट्युट यांच्यातर्फे खेर्डी येथील आशा सेविकांचा सन्मान .
हेल्प फाऊंडेशन चिपळूण तसेच उमा फॅशन इन्स्टिट्युट यांच्यातर्फे खेर्डी गटातील आशा सेविकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . संपूर्ण कोविड काळात जिवाची पर्वा न करता धडाडीने काम करून समाजाप्रति असलेली बांधिलकी जपण्याचे मोलाचे काम आशांनी केले आहे . अत्यल्प वेतनात काम करत असताना कधी कधी फार वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो . तरीही आशा आपले कर्तव्य पार पाडत असतात. पूराच्या काळात देखील स्वताच्या घरात पुरामुळे नुकसान झाले असताना सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आशा हजर होत्या .
उमा फॅशन इन्स्टिट्यूट गेली १५ वर्षे महिलांना टेलरिंग व्यवसाय ट्रेनिंग देते, नुकताच जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये काही आशा सेविका यांनी प्रवेश घेतला, त्यावेळी चर्चेत आशा सेविका सामाजिक बांधिलकी कशी जपतात तसेच त्यांचे काम किती महत्वाचे आहे हे दिसून आले . आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा असे ठरले .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वृंदा दाते उपस्थित होत्या . हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सतीश कदम उमा फॅशन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा उमा म्हादाळकर हेल्प फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष अंजली कदम आशा गटप्रवर्तक सौ . श्रद्धा जाबरे ,ज्येष्ठ समाजसेविका सीमा ताई चाळके ,समाज सेविका दिप्ती सावंत देसाई यांच्याहस्ते आशांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . आशा गटप्रवर्तक सौं . श्रद्धा जाबरे यांनी आपल्या तडफदार भाषणात आशा सेविकांचे काम , त्यांच्या समस्या तसेच त्यांना मिळणारी वागणूक याबद्दल माहिती दिली .ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक तसेच हेल्प फाऊं . अध्यक्ष सतीश कदम यांनी आशा सेविकांना मार्गदर्शन केले . व त्यांनी त्यांच्या हक्कासाठी जो लढा उभारला आहे त्यासाठी पाठिंबा देवून मदत करण्याचे आश्वासन दिले .
यावेळी खेर्डी चिंचघरी गटातील आशा तसेच खेर्डी माजी सरपंच सौ स्नेहल चाळके उपस्थित होत्या . सौं संजना भुरण , सौं . रिया महाडीक , सौ . मानसी महाडीक , सौं प्रज्ञा घाग नेहा शेट्ये , पद्मा ओली , वर्षा खटके उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे
स्मिता जानवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
*……………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

