कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्रीमती संघटने तर्फे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम.

_*🛑 श्रीमती संघटने तर्फे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम..*_

_*🛑 विधवा स्त्री बाबत अनिष्ट रूढी प्रथा यांच्या विरुद्ध जनजागृती साठी मोहीम..*_

_*🛑 नाही मी सदवा नाही मी विधवा मी आहे श्रीमती..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०९ :-* सावंतवाडी येथील सालईवाडा मधील सार्वजनिक गणपती मंदिरात आज रोजी विधवा महिलांकरता हळदी कुंकू तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रस्तुत कार्यक्रम हा ‘श्रीमती संघटना’ यांच्यातर्फे रथसप्तमी चा मुहुर्त साधून करण्यात आला.
सदर कार्यक्रमास जवळ जवळ ६० ते ७० विधवा महिला उपस्थित होत्या. तारामती सहदेव बोरुडे, शैला विलास पटेकर, वासंती वामन गवळी, राजश्री राजेंद्र काटाळे, स्मिता दिगंबर राणे, सुमित्रा गजानन गवस, ललिता धोंडू परब, विजया विनया शृंगारे, नम्रता रामकृष्ण केसरकर, क्रांती सुभाष मिसाळ, गीता गोविंद साबळे, रामीरामा कोळेकर, सुनीता नारायण वाडकर, मंदा दत्तात्रय वाडकर, संध्या शरद भोसले, वंदना दशरथ पाटणकर ,आशालता देवदास वेंगुर्लेकर, जयश्री विनायकराव सावंत, दर्शना दत्ताराम मडगावकर, मीना विजय वाडकर, अश्विनी म्हापसेकर प्रभावती आंबेडकर, सुनिता धामापुरकर, भारती भालचंद्र निरवडेकर, सरिता काशिनाथ
आसोलकर, जानकी रामचंद्र आंबेडकर, सुनंदा चंद्रकांत खडपकर, सुरेखा दामोदरे रेमने, सविता नारायण सावंत, निर्मला घनश्याम पाटणकर, प्रज्ञा सावंत, सरस्वती शशिकांत पाटणकर आदी महिला उपस्थित होत्या.
सदर श्रीमती संघटना ही विधवा महिलांसाठी काम करणारी संघटना असून सदर संघटनेचे मुख्य पदाधिकारी या अॅड नीता कविटकर सावत असून. एडवोकेट नम्रता नेवगी तसेच आयर्न डिसा, संध्या मोरे कदम इ. आहेत. सदर संघटनेच्या सर्व सदस्यांसह आज जवळ जवळ ६० ते ७० महिलांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमांमध्ये आज सर्व विधवा महिलांकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती पंचायत समितीत कार्यरत असलेल्या सौ. संध्या मोरे-कदम यांनी दिली. तसेच कायदेविषयक माहिती एडवोकेट नम्रता नेवगी यांनी दिली एकंदरीत सर्व कार्यक्रम हा हसत खेळत पार पडला. सदर कार्यक्रमास अंतर्गत बहुसंख्य महिलांनी आपल्या मनात असलेल्या अनेक भावना मुक्तपणे व्यक्त केल्या व अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत जेणेकरून विधवा झाल्यानंतर स्त्रीला सर्व कार्यक्रमातून बहिष्कृत करण्यात येते तो प्रकार थांबवावा अशी तळमळ आज प्रत्येक उपस्थित असलेल्या महिलेने स्वतः बोलून दाखविले. तसेच यापुढेही असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्यासाठी घ्या असेही आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रम द्वारे आपल मनोगत व्यक्त करताना अॅड. नीता कविटकर सावंत यानी विधवा मदत होईल तसेच उतार वयात ज्याना काहीच आथिर्क सहाय्य नाही त्याना सरकारमार्फत असलेल्या निरनिराळ्या योजनेचे फायदे मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा व तसेच विधवा स्त्रीबाबत मानण्यात येणारे समज गैरसमज व अनिष्ट रूढी
कार्यक्रम आमच्यासाठी घ्या असेही आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रम द्वारे आपल मनोगत व्यक्त करताना अॅड. नीता कविटकर सावंत यानी विधवा मदत होईल तसेच उतार वयात ज्याना काहीच आथिर्क सहाय्य नाही त्याना सरकारमार्फत असलेल्या निरनिराळ्या योजनेचे फायदे मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा व तसेच विधवा स्ञीबाबत मानण्यात येणारे समज गैरसमज व अनिष्ट रूढी प्रथा याचे विरुद्ध जनजागृती करण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात येईल असा मनोदय व्यक्त केला.

*……………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!