🛑 “मराठी भाषा जेवढी कठीण आहे तितकीच सोपी आहे. ” हे विद्यार्थ्यांनी ज्ञात ठेवावे..
🛑 मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातील ग्रंथ प्रदर्शनात ग्रामीण लोककलेचे (दशावतार व अन्य) अभ्यासक रितेश राऊळ यांचे मार्गदर्शन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-२९ :- “मराठी भाषा जेवढी कठीण आहे तितकीच सोपी आहे. ” या विषयावर उपस्थित विद्यार्थी, वाचक व ग्रामस्थ यांना माहिती देताना मळगांवचे सुपूत्र तथा ग्रामीण लोककलेचे (दशावतार व अन्य) अभ्यासक तथा मळगांव इंग्लिश स्कूलचे संगणक प्रशिक्षक रितेश राऊळ यांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले.मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे हे 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत बालसाहित्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील मळगांव या गावात भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास या विषयावर आधारित भरविण्यात आलेल्या या बालसाहित्याचे ग्रंथप्रदर्शनात बाल साहित्य व माहिती पर पुस्तके ठेवण्यात आली होती. यावेळी उपस्थित वाचक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना रितेश राऊळ यांनी.एम. पी. एस. सी. परिक्षे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करताना आपल्या यशात व अभ्यासात कै. प्रा. उदय खानोलकर वाचनमंदिराचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.यावेळी वाचनालयाचे कार्यवाहक गुरुनाथ नार्वेकर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाचे महत्व विषद करताना गावातील वाचकांनी या वाचनमंदिरातील पुस्तकांचे वाचन आतापर्यंत आपल्या ज्ञानात भर घालून विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. भविष्यातही या वाचनमंदिरातील ज्ञानभंडाराचा योग्य वापर करावा,असे आवाहन आपल्या प्रास्ताविकपर भाषणात केले.यावेळी ग्रंथालयाचे कर्मचारी आनंद देवळी यांनी आभार प्रदर्शन केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कर्मचारी पूर्वी नार्वेकर व गीता कोंडये यांनी सहकार्य केले. यावेळी वाचक व पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

