🛑 शिष्यवृत्ती परिक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा पारस दळवी राज्यात 11 वा आणि जिल्हयात प्रथम..
🛑 5 वी चा योगेश जोशी जिल्ह्यात पाचवा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-२४ :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पै यांच्यातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता 5 वी) व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) परीक्षेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर काॅलेज सावंतवाडी प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रशालेचा कु. पारस प्रसाद दळवी याने (272) गुण मिळवून राज्यात 11 वा. तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ( इयत्ता 5 वी) व (इयत्ता 8 वी) चे एकूण 5 विद्यार्थी शहरी सर्व साधारण विभागातून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.
यामध्ये शहरी सर्व साधारण विभागातून इ. 5 वी मधील कु. योगेश विवेकानंद जोशी (264) गुण मिळवून जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात तिसरा तसेच शहरी सर्वसाधारण विभागातून इ. 8 वी मधील कु. सत्यम महेश पेडणेकर (200) गुण मिळवून जिल्ह्यात 27 वा. तर तालुक्यात आठवा आला. कु. लता महेश परब(182) गुण मिळवून तालुक्यात 13 वी आली. कु. हिमानी श्रीराम धोंड ने (176) गुण मिळवून तालुक्यात सोळावा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या यशात प्रशालेच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असून इयत्ता 5 वी साठी श्रीम.सुखदा गणेश म्हापणकर,श्रीम.रेश्मा गुरुप्रसाद राणे, श्रीम. प्रिती प्रविण सावंत, श्रीम. स्वरा सुबोध शिरोडकर तसेच इयत्ता 8 वी साठी श्रीम. भाग्यश्री रामचंद्र चौकेकर , श्रीम. पुनम शत्रुघ्न कोचरेकर, श्रीम. रसिका रमाकांत राऊळ, श्रीम. मानसी दिनेश नागवेकर तसेच श्री. दशरथ रामकृष्ण शृंगाराचा या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष विकास भाई सावंत, सचिव व्ही. वि. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डाॅ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उप मुख्याध्यापक एस. पी. नाईक यांनी अभिनंदन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनीना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

