कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगांव देऊळवाडी अंगणवाडीत बालिका दिन साजरा..

🛑 अंगणवाडीतील बालिकांची चित्रकला व संगीत खुर्ची व भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२४ :- देशातील बालिकांना त्यांच्या हक्क व अधिकारांची माहिती देणे, त्यांना जागृत करणे व त्यांना शिक्षण, स्वास्थ्य व रोजगार याबाबत जागृत करणे तसेच त्यांना आधार व संधी मिळवून देतानाच स्त्री भ्रूणहत्या, लैगिक शोषण याबाबत त्यांच्यात जागरुकता आणणे या उद्देशाने साजरा करण्यात येणारा बालिका दिन सोमवारी मळगांव देऊळवाडी येथील अंगणवाडी येथे साजरा करण्यात आला.
या बालिका दिनाच्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच बालिका दिन संगीत स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा व भिंती पत्रिका स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविका अश्विनी गावकर, भावना सावंत तसेच स्थानिक महिला मिनल मळगांवकर व रंजना राऊळ आदी उपस्थित होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धा व वेशभूषा कार्यक्रमात अंगणवाडीतील मुलींनी सहभाग घेतला. बालवाडी विद्यार्थीनी कु, निधी मळगांवकर तसेच शालेय विद्यार्थीनी तन्वी मळगांवकर, केतकी सावंत, यक्तीने सावंत, सानिका गावकर, आर्या गावकर व तेज मळगांवकर यांनी सहभाग घेऊन आपले कला कौशल्य दाखविले.
यावेळी उपस्थित बालिका व मुलींना
सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी या जयंती दिना निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेल्या 24 जानेवारी या दिवसाचे महत्व समजावे यासाठी देशभर साजरा केला जाणारा व वर्ष 2009 पासून सुरु झालेला यावर्षी चा 14 वा बालिका दिन देऊळवाडी अंगणवाडीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!