🛑 हाटपाटी वाळू व्यावसायिकांना काँग्रेसमुळे मिळाला दिलासा..
🛑 चिपळुणातील वाळू व्यावसायिकांकडून काँग्रेसचे मंत्री, नेते, पदाधिकारी यांचे आभार..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२४ :- हातपाटी वाळू व्यावसायिकांबाबत ऐतिहासिक निर्णय घेऊन या व्यावसायिकांना दिलासा दिल्याबद्दल चिपळुणातील हातपाटी वाळू व्यावसायिकांनी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून हातपाटी वाळू व्यावसायिकांचे प्रश्न प्रलंबित होते. यात रॉयल्टीचा प्रमुख मुद्दा होता. यासंदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्याशी ते चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी वाळू व्यावसायिकांच्या अडचणी मा. पटोले साहेबांसमोर मांडल्या होत्या. त्यावेळी मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून या अडचणी सोडवण्याचे आश्वासन मा. पटोले साहेबांनी दिले होते. तसेच वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नावर मा. यादव साहेब यांनी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. अविनाशजी लाड साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चाही केली होती. दरम्यान, नुकतीच मुंबई येथे मंत्रालयात महसूलमंत्री मा. थोरात साहेब आणि महसूलचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत हातपाटी वाळू व्यावसायिकांसाठीची पर्यावरण दाखल्याची अट रद्द करण्याचा आणि त्यांना रॉयल्टीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच छोट्या हातपाटी आणि डुबी पद्धतीने वाळू व्यवसाय करणाऱ्या गरीब व्यावसायिकांना वाळूची रॉयल्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसचे मंत्री, नेते आणि पदाधिकारी यांच्यामुळे वाळू व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया कोकण खाडी पारंपारिक हातपाटी वाळू व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष श्री. अन्वर जबले यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी चिपळुणातील वाळू व्यावसायिकांच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, राजापूरच्या माजी आमदार मा. हुस्नबानू खलिफे, महाडचे माजी आमदार मा. माणिकराव जगताप, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. अविनाश लाड आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव यांचे आभार मानले.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

