कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 नारदखेरकी येथे शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

 🎴चिपळूण, दि-२४:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी नारदखेरकी पवारवाडी येथे उपविभागप्रमुख रघुनाथ चाळके यांच्या निवासस्थानी स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला जि.प.सदस्य बाळकृष्ण जाधव , पं.स. सदस्य शरद शिगवण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून अभिवादन केले . या कांक्रमप्रसंगी पत्रकार सुभाष कदम यांनी बाळासाहेबांचे ज्वाज्वल्य हिंदुत्ववादी विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत . शिवसेनेच्या माध्यमातून सामाजातील तळागाळातील मराठी माणसाला न्याय देण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी दिल्याचे सांगितले . प.स. सदस्य शरद शिगवण यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून आपण विकास कामे करण्याचा प्रयत्न केला . शिवसेनेमुळेच शाखाप्रमुख ते उपसभापती होण्याची संधी मिळाली असून आता येणाऱ्या निवडणुकीत आघाडी न करता शिवसेनेने स्वबळावर लढावे असे सांगितले . तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी शिवसेनाप्रमुखांचे आजही जगभर आदराने नाव घेतले जाते . साहेबांच्या शब्दात विलक्षण ताकद होती . त्यांनी एकदा शब्द दिला की वाटेल ते झाले तरी तो ते पूर्ण करीत होते म्हणूनच असख्य शिवसैनिक त्यांच्यावर जीव ओवाळीत असत . या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे ते कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करुया . आघाडी करणे न करणे हा वरिष्ठाचा निर्णय असेल . आपल्याला जो आदेश येईल तो पाळणे कर्तव्य आहे . उमेदवार कोण आहे हे न पाहता धनुष्यबाण निशाणी लक्षात ठेवून या भागात आपल्याला भगवा फडकवायचा आहे असे आवाहन केले . जि.प. सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांविषयी विचार मांडले , छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते . बाळासाहेबांनी कधी कुणावर अन्याय होऊ दिला नाही असे सांगून आगामी निवडणुकीत आपण सर्वांनी विकासासाठी शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहा असे सांगितले . यावेळी नारदखेरकी सरपंच तनुजा साळवी , ओमळी सरपंच प्रदीप घडशी , देवखेरकी सरपंच महेंद्र हळदे , माजी पं . स . सदस्य सिताराम बांद्रे , कळंबट विभाग प्रमुख राजेंद्र दळवी , उपविभाग प्रमुख रघुनाथ चाळके , पवारवाड़ी शाखाप्रमुख विजय पवार , शाखाप्रमुख मारुती बांद्रे , माजी सरपंच पांडुरंग बांद्रे , युवासेना उप विभाग | अधिकारी सुयोग कदम , जितेंद्र कदम , पपूशेठ हळदणकर , मुकुंद जाधव , विलास दळवी आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . सरपंच घडशी यांनी आभार मानले .

 

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

 

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

 

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

 

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

 

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

 

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!