कोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित बिरोडकर टेंब प्रिमीयर लीग च्या दुसऱ्या पर्वाचे थाटात उद्घाटन..

🛑 जय एट,साई सावली, संघाची चमकदार कामगिरी,तर शिव स्पोर्ट, एल डी स्पोर्ट,माऊली एट,संघांची पुढील फेरीत प्रवेशा साठी धडपड..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३ :- टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित बिरोडकर टेंब प्रिमीयर लीग पर्व दुसरे चे उद्घाटन शनिवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे ,माजी नगरसेवक विलास जाधव ,मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीप म्हापसेकर,हरी जाधव, गंगाराम बिरोडकर ,चंद्रकांत परब, मधुकर गोसावी ,सदाशिव परब, मनोहर परब ,विजय बिरोडकर ,संतोष गावडे, प्रकाश गावडे , रामकृष्ण गावडे, रणजीत परब,दिपक बिरोडकर,आनंद बिरोडकर,सचीन गावडे,मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाने २०२१पासून बिरोडकर टेंब प्रिमीयर लीग चे आयोजन केले होते या लिग चे हे दुसरे वर्ष येथील रहिवासी असलेल्या आठ संघ मालकांनी संघ निवडले होते व त्यांचे सामने दोन दिवसाच्या सत्रात होणार आहेत, आजच्या पहिल्या सत्रात जय एट व साई सावली संघाने चमकदार कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश केला, तर शिव स्पोर्ट,एल डी स्पोर्ट व माऊली स्पोर्ट संघानेही चांगली कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मंडळाचा एकोपा पाहून समाधान व्यक्त केले व हे लीग म्हणजे आनंद मेळावा आहे, मुंबई येथून या लीग साठी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहिलेत ,त्यामुळे खऱ्या अर्थाने या लिगची रंगत वाढली असा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात,तर विलास जाधव यांनीही शुभेच्छा देताना मंडळाच्या एकोप्याची व विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी मंडळ राबवत असलेले कार्यक्रम हे स्तुत्य असल्याचे सांगून मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला ,त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!