मास्क वापराबाबत अधिकारी अनभिज्ञ
🛑मास्क वापराबाबत अधिकारी अनभिज्ञ
🛑प्रशासनाकडून प्रबोधनाची गरज
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि,१८- जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला असून या विषाणूंचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे .मात्र हा मास्क का वापरायचा ? याचे कारण काय? याचा वापर किती करायचा ?वापर झाल्यावर याचे काय करायचे? याविषयी नागरिक शासकीय अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे . प्रशासनाने याबाबत नागरिकांमध्ये तसेच अधिकारी कर्मचारी वर्गामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची साथ सर्वत्र हातपाय पसरू लागली आहे. या विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रकारे उपाययोजना राबवित आहे .जिल्हा प्रशासन आरोग्य विभागामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती मोहीम राबविली जात आहे. प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे .या आदेशाचे पालन करताना नागरीक दिसत आहेत. मात्र चेहऱ्याला मास्क लावला म्हणजे आपण यातून बचावलो अशी भावना नागरिकांमधून अधिकारी कर्मचारी वर्गातून मधून दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना कोरोनाविषाणू बाधित व्यक्तींच्या खोकल्याच्या तुषारामधून कोरोनाविषाणू पसरत असल्याचे तुषार आपल्या श्वासाबरोबर शरीरात गेले तर या आजाराची लागण आपल्याला होऊ शकते. म्हणून मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांनी ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. अशा रुग्णांच्या निरोगी नातेवाईकांनी सर्दी खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीने रुग्णांना तपासताना डॉक्टर व आरोग्य सेवा कर्मचारी यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. काही व्यक्ती कित्तेकदा मास्क घातल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून नाक उघडे ठेवले जाते. व बोलताना त्रास होऊ नये म्हणून मास्क सैल बांधला जातो. हे चुकीचे असून मास्क वापरताना तोंड आणि नाक पूर्ण झाकले गेले पाहिजे. चेहऱ्यावर मास्क सैल न बांधता घट्ट राहिलं असा बांधला पाहिजे . मास्क वापरून झाल्यानंतर तो काढताना मागच्या बाजूने सैल करून काढावा. कापडी किंवा चांगल्या क्वालिटीचे मास्कचा वापर करावा साबण व गरम पाण्याने धुऊन मास्क पुन्हा वापर करता येऊ शकतो .पण साधा मास्क बदलावा लागतो मास्क काढल्यानंतर हात साबण व पाण्याने शास्त्रीय पद्धतीने धुवावे.वापरलेला मास्क जाळून नष्ट करावा. कोरोनाचा विषाणू नाकातोंडातून शरीरात जातो यामुळे चेहऱ्याला मास लावला की आपण यातून बचावलो असे भावना निर्माण होऊन संदर्भात शास्त्रीय माहिती नसल्याने याबाबत नागरिक अधिकारी कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे . कणकवली येथील एका कार्यालयात असलेल्या कर्मचारी यांच्या तोंडावरील मास्क खाली होता .अशा मास्क नसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आदी अधिकारी व कर्मचारी यांना मास्क नसल्यास कारवाई करा मगच सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर कारवाई करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे.
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

