रिक्षाचालक मालकांच्या मागण्या पूर्ण करा …
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग : दि. ०७ जानेवारी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत लेखी निवेदन सिंधुदुर्ग परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांना देण्यात आले वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संघटनेच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिद्रे, कार्याध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा सेक्रेटरी सुधीर पराडकर, जिल्हा खजिनदार राजन घाडी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ओरोसकर , सचिन तळेकर ,प्रमोद प्रभू मालवण तालुका अध्यक्ष श्री गडेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष धर्मेंद्र सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष अविनाश पाटील, देवगड तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

