कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचा गाळ काढण्याच्या कामासाठी हातभार

🛑 नाम फाउंडेशन कडे दिला दहा हजार रुपयांचा धनादेश..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०४:- शहरातील शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून या कामाचा शुभारंभ मंगळवारी ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान सावर्डे तर्फे गाळ काढण्याच्या उपक्रमासाठी १० हजार रुपयांचा धनादेश नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याबद्दल या प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवले जातात. दरम्यान, वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूण बचाव समितीने नागरिकांच्या सहकार्याने ६ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. तब्बल २८ दिवस उपोषण सुरू होते. या उपोषणाची शासन-प्रशासनाने दखल घेतली. तर दुसरीकडे नाम फाऊंडेशनने देखील शिवनदीतील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने यंत्रसामुग्री देखील मागविण्यात आल्या आहेत. तर मंगळवारी शिवनदीतील गाळ काढण्याच्या शुभारंभ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. यानुसार शुभारंभ देखील झाला. तर या उपक्रमात आपला हातभार रहावा, यासाठी सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानने पुढाकार घेत नाम फाऊंडेशनने नाना पाटेकर यांच्याकडे १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सदर वेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.श्री.बी.एन.पाटील , प्रांतअधिकारी श्री. प्रविण पवार तहसीलदार मा.जयराज सुर्यवंशी, नाम फाऊंडेशनचे समीर जानवलकर, स्वप्नील चिले, माजी सभापती पूजा निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश सावर्डेकर, खजिनदार सुरेश बागवे, संजय घाग मनोज घाग, चंद्रशेखर राऊत, दिपक उघडे आदी सदस्य उपस्थित होते.

 

________________________

,*सर्व ग्राहकांना खुश खबर*

• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

 

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*

(सन १९५३ पासून )

 

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*

मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग

*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*

*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*

◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra

◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध

🎉100+ सायकल उपलब्ध

🎉ग्राहकांनी लाभ घ्या

*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*

• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

 

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

 

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

 

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

 

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

 

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!