कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात येणार आहे ऑक्सीजन प्लांट.. आमदार दीपक केसरकर
🛑 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात येणार आहे ऑक्सीजन प्लांट.. आमदार दीपक केसरकर
🛑 ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला ऑक्सीजन प्लांट चा शुभारंभ
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि,:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले असून या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्यातील एका प्लांटमध्ये ऑक्सिजनची निर्मिती, तर दुसरा प्लांटमध्ये साठवणूक केली जाणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जात आहे,अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनचे २०० जम्बो सिलिंडर उपलब्ध आहेत त्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा जाणवणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे असे आमदार केसरकर यांनी सांगितले.
या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील अडीअडचणी सुधा लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आपण येत्या पंधरा दिवसात बैठक बोलून चर्चा करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील रुग्णालयाची पाहणी केली. तसेच याप्रसंगी नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील, डॉ. पी.डी. वजराठकर, प्राची राणे, आशा मिशाळ, सुप्रिया नाईक आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहे. हे प्लांट तयार झाल्यानंतर भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तसेच ऑक्सिजन अभावी रूग्णांवर उपचार करता आले नाही, अशी परिस्थिती उद्भवणार नाही. यापूर्वी रुग्णालयाला १२० ऑक्सिजन सिलेंडर आपण आमदार निधीतून दिले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णालयात २०० ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता आहे. तर ऑक्सिजन निर्मिती प्लांट आणि ऑक्सिजन साठवणूक प्लाटंची या ठिकाणी निर्मीती होत असल्यामुळे ऑक्सिजन नाही ही चिंता मिटणार आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच उपजिल्हा रुग्णालय नुतनीकरण १ कोटी तर उप-जिल्हा रुग्णालयात यंत्रसामुग्री करीता १कोटी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्ट्रेचर वरुन नेतानाचा मार्ग बनवून दिला जाणार आहे, असे आमदार केसरकर यांनी सांगितले
तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारत असून वेंगुर्ल्यात अद्यावत असे रुग्णालय उभे राहिले आहे. त्याच धर्तीवर दोडामार्गात सुद्धा नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २४ कोटीचा निधी उपलब्ध असून नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर त्या कामाचा सुद्धा शुभारंभ करण्यात येईल, तर सावंतवाडी रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणाससह इतर सोयी-सुविधांसाठी आमदार निधीतून आपण दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. असे ते म्हणाले.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दत्त जयंतीच्या निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

