कोकणातील तरुणांनी नोकरीसाठी मुंबई सारख्या शहराकडे न पळता शेतीकडे लक्ष द्यावे
🛑कोकणातील तरुणांनी नोकरीसाठी मुंबई सारख्या शहराकडे न पळता शेतीकडे लक्ष द्यावे
🛑महाराष्ट्र राज्य कृषी विभाग अधिकारी व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी रसायन विभाग कृषी तज्ञांतर्फे शेतकरी कुटुंबातील तरुणांना आवाहन
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️प्रतिनिधी:सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी:-* मागील दोन वर्षात कोविड-19 या रोगामुळे लागलेल्या लाॅकडाऊन च्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ शेती हा उद्योग देशात सुरु होता. त्यामुळे शेती हाच उद्योग व या उद्योगाशी निगडीत व्यवसाय यांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मोलाचे मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मळगांव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेती तज्ञ व कृषी अधिकारी यांनी केले.
श्री सुधाकर भागवत भटजी यांच्या दत्त मंदिर मळगांव येथे सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात मळगांवच्या सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, कृषी अधिकारी विजय वाघमारे, शेती तज्ञ चेतन प्रभू,कृषी सहाय्यक मळगांव छाया मेस्त्री,कृषी सहाय्यक कुडाळ सचिन चोरगे,तळवडे कृषी अधिकारी यशवंत गवाणे तसेच पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी रसायन शास्त्र विषयाचे प्रमुख प्राध्यापक गणपत शिरोडकर व मळगांव ग्रामपंचायत सदस्यांची सौ. निकिता बागडे व सदस्य आनंद देवळी यांच्यासहित मळगांव मधील शेतकरीबंधू उपस्थित होते.
या मेळाव्यात उपस्थित कृषी अधिकारी व तज्ञांनी “आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण ” या विषयासहित “माती परिक्षण व शेती व्यवस्थापन ” या विषयांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.या मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांनी आपले शेती विषयक प्रश्न मांडून कृषी अधिकारी व तज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी चेतन प्रभू यांनी ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात माती परीक्षण व शेती व्यवस्थापन केले जाते तसे व्यवस्थापन येथील शेतकरी बांधवांनी कसे करावे, शेती मालाची विक्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. सचिन चोरगे यांनी आपले मत मांडताना येणारा काळ हा शेतकरी बांधवांचा असेल असा विश्वास व्यक्त करुन याबाबत शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. विजय वाघमारे यांनी शेती व फळझाडे यांना किड व रोग लागू नयेत यासाठी साफसफाई व फवारणी आवश्यक असल्याचे सांगितले. यशवंत गवाणे यांनी शेतकऱ्यांनी स्मार्ट फोनचा वापर करुन शेती विषयक आधुनिक ज्ञान प्राप्त करावे, जमिनीचे आरोग्य जपावे, जेसीबी चा वापर टाळावा, तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न पळता शेतीकडे वळावे असे प्रतिपादन केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक गणपत शिरोडकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील व आभारप्रदर्शन आनंद देवळी यांनी केले.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

