आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

समाजासाठी योगदान देणारे हात व्हा : काडसिद्धेश्वर स्वामीजी

🛑समाजासाठी योगदान देणारे हात व्हा : काडसिद्धेश्वर स्वामीजी

🛑सेवांकुर भारततर्फे सिद्धगिरी हॉस्पिटल येथे बी.एल.एस. प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण- गतकाळातील विचार केला असता लाखो तरुणांनी देशासाठी योगदान दिले , देशासाठी स्वताच्या स्वार्थाचा त्याग केला, म्हणूनच देश स्वातंत्र्य झाला. जर त्या तरुणांनी स्वतःचा विचार केला असता तर आजचा हा सफल दिवस आपल्याला दिसला नसता. त्याच देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांचे स्मरण आपण नित्य ठेवले, त्यांचा आदर्श ठेवला तर आपण नक्कीच देशासाठी आदर्श कार्य करू शकू. देशासाठी हीच त्याग वृत्ती अंकुरित करण्याचे कार्य सेवांकुर भारत हि संस्था करत आहे. नवोदित डॉक्टरांनी आज या प्रशिक्षण शिबिरातून देशसेवा हीच प्रेरणा घेवून जावी.” असे मत सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे सेवांकुर भारत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत केले मांडले.

यावेळी पुढे बोलताना जेष्ठ भूलतज्ञ डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले “बी.एल.एस. प्रशिक्षण हे समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी आत्मसात केले तर अनेकांचे प्राण वाचवणे सहज शक्य आहे. अनेक वेळा रुग्णाचे प्राण हे रुग्णालयापर्येंत येई पर्येत जातात, याचे प्रमाण अधिक आहे. कोणत्याही साधनाविना आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, त्यामुळे बी.एल.एस. प्रशिक्षण महत्वाचे आहे. आज स्वामीजींच्या प्रेरणेने सिद्धगिरी हॉस्पिटलच्या व्यासपीठावर हे प्रशिक्षण नवोदित डॉक्टरांना देण्यात येत आहे, हि प्रशंसनीय बाब आहे. येथे प्रशिक्षित झालेले डॉक्टर भविष्यात अनेकांचे प्राण वाचवण्यास नक्कीच सक्षम होतील.”
अनेकांना आयुष्यात काही तरी वेगळ करण्याची इच्छा असते. स्वतासाठी जगताना थोडं समाजासाठी हि जगावं, आपलं आयुष्य सेवेच्या परिस्पर्शाने आशय संपन्न करावे. पण हे सगळे करताना बऱ्याच वेळा योग्य मार्गदर्शन मिळत नाही, दिशाच सापडत नाही. या सर्व प्रश्नांची उकल व्हावी, एका विशाल अशा विविध समाजोपयोगी प्रकल्प पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली राबवणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल येथे पश्चिम महाराष्ट्रातील तरुण नवोदित डॉक्टरांच्या साठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सिद्धगिरी येथे संपन्न झाले. यावेळी डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. राजेश पवार, डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी नवोदित डॉक्टरांना बी.एल.एस. प्रशिक्षण दिले. यावेळी या कार्यशाळेत डॉ. राजेश पवार यांनी सेवांकुर प्रकल्पाची माहिती देवून या प्रकल्पाचा उद्देश सांगून रुग्णसेवेचा वसा घेण्याचे आवाहन केले. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या प्रकल्पाची माहिती डॉ.प्रकाश भरमगौडर व श्री.शिवानंद अपराज यांनी उपस्थितांना दिली. यानंतर विद्यार्थी डॉक्टरांनी सिद्धगिरी मठाच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून १२० नवोदित डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.या शिबिराचे आयोजनासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गान विशेष परिश्रम घेतले.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!