आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

जिल्हा बँक राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरायची आहे – आमदार नितेश राणे

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २२ डिसेंबर – देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचा सिद्धिविनायक सहकार पॅनलला पाठिंबा आहे. अमित शहा यांना सहकार क्षेत्र मजबूत करायचे आहे, विकसित करायचे आहेत. नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला होणार आहे. शेतकरी सक्षम होतील, रोजगार निर्मिती करता येईल. यामुळे सिद्धिविनायक पॅनलला विजयी करावे.

खालच्या पातळीचे राजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवत नाही आहोत. आदर्श आचारसंहिता आपण पाळणार आहोत. कोणीही कितीही आरोप केले तरी आम्ही राजकी बोलणार नाही. विकासात्मक बाबींवर आपण बोलणार आहोत. जे काही असेल ते ३० नंतर बोलू. ही निवडणूक राजकीय नाही. लोकांचा फायदा कसा होईल याकडे आमचे लक्ष असेल. सहकार क्षेत्र विकसित व्हावे यासाठी आपले प्रयत्न असतील. लवकरच आमचा जाहीर नामा प्रसिद्ध करू, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक सहकार पॅनलचे उमेदवार राजन तेली, अतुल काळसेकर, महेश सारंग, कामलांकत कुबल, दिलीप रावराणे, प्रकाश गोडस, विठ्ठल देसाई, प्रकाश मोरये, गुरुनाथ पेडणेकर, मनीष दळवी, प्रकाश गवस, गजानन गावडे, संदीप परब, समीर सावंत, अस्मिता बांदेकर, प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, सुरेश चौकेकर, रवींद्र मडगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, ३० डिसेंबर रोजी होणारी जिल्हाबँक निवडणूक आपण सिद्धीविनायक सहकार पॅनलखाली लढवत आहोत. आमचे १९ उमेदवार असून आमच्या पॅनलला कप बशी चिन्ह मिळालं आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाबँकेचा विकास झाला आहे. बँकेला झालेले सर्व फायदे हे केवळ नारायण राणे यांच्या मुळेच मिळाले आहेत. विरोधकांनी केवळ पुस्तकात छापून श्रेय घेतलं आहे. कोणीही कितीही टीका केली आणि कितीही खोट बोलून श्रेय घेतलं तरीही सिद्धिविनायक सहकार पॅनलच्या १९ च्या १९ जागा निवडून आणणार आहोत.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!