कास ग्रामपंचायत प्रशासना विरोधात प्रसाद परब यांचे लाक्षणिक उपोषण
कास ग्रामपंचायत प्रशासना विरोधात प्रसाद परब यांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची दाद नघेणे ही लोकशाही देशात शोकांतिका
सावंतवाडी, दि.१४:-प्रसाद परब यांनी कास गावाच्या स्ट्रिट लाईटच्या कामाचा ठेका १६ लाख ५१ हजार ८७ रुपयाला घेतला होता.त्याचे अग्रीमेट करण्यात आले होते.सदरचे काम पूर्ण करुनही कास ग्रामपंचायत ने केवळ ४ लाख ५० हजार रुपयाचा धनादेश दिलेला आहे.उरवरीत रक्कमेची मागणि केली असता उडवाउडवीची ग्रामपंचायत प्रशासन देत असल्याने परब हे कास ग्रामपंचायत परिसरामध्ये लाक्षणिक उपोषणाला बसले होते.मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या उपोषणाची दखल नघेतल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले.यावेळी त्यांनी आपण एका खोलीमध्ये लाईट सामान व घरगुती सामान ठेवले होते,सदरची खोली ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेली होती.मी नसताना त्यांनी मी लावलेले कुलुप तोडुन आपले कुलुप लावले होते.त्यानंतर त्यावर माझे दुसरे कुलुप लावले होते.अद्यापर्यंत मला माझे सामान मीळालेले नाही.आपण जिल्हापरिषद कडे उपोषण करणार आहे.लोकशाही देशात उपोषणाची दखल नघेणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामसेवक राजेंद्र देसाई यांना विचारले असता त्यांनी परब यांना कोलेभाटवाडी,दाभाळवाडी,भाईपवाडी या दोन कामाचा ठेका दिला होता.त्या कामाचा त्यांना ८ लाख ५० हजारांचा धनादेश देण्यात आला आहे.त्यानंतर त्याचा परवान्याची मुदत संपल्याने त्यांचा परवाना नुतनीकरण होईपर्यंत दुसर्या ठेकेदाराला काम देण्यात आले.त्याने ते काम पूर्ण केल्याने उर्वरीत रक्कमेचा धनादेश सदर ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगितले.