जिओचा केबल खोदाईसाठी आलेल्या कामगारांवर दोन दिवस उपासमारीची वेळ
*_🛑 जिओचा केबल खोदाईसाठी आलेल्या कामगारांवर दोन दिवस उपासमारीची वेळ*
*🛑 कंत्राटदाराचा संपर्क न झाल्याने जावे लागले दोन दिवस उपाशी*
*🛑सामाजिक बांधिलकी जपत सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव ,रवी जाधव ,संजय पेडणेकर, सुरेश भोगटे, प्रा,सतीश बागवे, यांनी केली आर्थिक मदत*
*🛑सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी आपल्या टेम्पोतून सोडले कुडाळ रेल्वे स्टेशनला*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-१२ डिसेंबर*
जिओ केबल च्या खोदाई कामासाठी इंदूर येथून आलेल्या अकरा कामगार व तीन लहान मुले यांना सावंतवाडी दोन दिवस उपाशी काढावे लागलेत ठेकेदाराचा संपर्क न झाल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली,अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव ,रवी जाधव ,संजय पेडणेकर ,सुरेश भोगटे, प्राध्यापक सतीश बागवे, यांनी प्रत्येकी एक हजार रुपयाची मदत करून त्यांना वाशिम येथे जाणाऱ्या रेल्वे मध्ये बसवले.
याबाबत अधिक माहिती अशी की आज संध्याकाळी सातच्या सुमारास समूहाने फिरणाऱ्या व भीक मागणाऱ्या या कामगारांकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाति यादव यांचे लक्ष गेले, त्यांनी त्यांच्याकडून माहिती गोळा करून याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना दिली, रवी जाधव यांनी आपले सहकारी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे,प्राध्यापक सतीश बागवे यांना दिली, त्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पाच हजार रुपयाची मदत संबंधितांना केली .
स्वाती यादव यांनी त्या अकरा जणांची खाण्याची व्यवस्था केली,रवी जाधव यांनी आपल्याकडील टेम्पोने त्यांना कुडाळ रेल्वे स्थानक येथे नेऊन रेल्वे मध्ये बसवले, गेले दोन दिवस रामेश्वर दादाराव रुमाले यांच्यासहित तीन पुरुष मंडळी, चार स्त्रिया व तीन लहान मुले असे ११ जणांवर कंत्राटदार न सापडल्याने उपासमारीची वेळ आली होती. याबाबत संबंधित कंत्राटदाराला संपर्क साधल्यानंतर त्याने आपले काम वाशिम येथे सुरू असल्याचे सांगत त्यांना त्या ठिकाणी पाठवून द्यावे असे स्पष्ट केले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव यांनी पुढाकार घेत आपल्याकडील एक हजार रुपयांची मदत केली व सर्वांनी मिळून पाच हजार रुपये जमा करून त्यांची रवानगी करण्यात आली.
सामाजिक बांधिलकीतून केलेल्या अभूतपूर्व कार्याची प्रशंसा करावी तेवढे थोडी आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

