स्वकर्तुत्वावर समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या रवी जाधव याच्या कर्तृत्वास व दातृत्वास सलाम
*🛑स्वकर्तुत्वावर समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या रवी जाधव याच्या कर्तृत्वास व दातृत्वास सलाम*.
*🛑अनेक वादळी झेलूनही, त्याच ताकदीने उभा असलेला रवी नवयुवकांसाठी प्रेरणादायी*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय:-सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-१३ डिसेंबर*
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला दारिद्र्य, दुःख ,गरीबी ,जन्मताच लाभलेला, परंतु स्वतःच्या जिद्दीने, कष्टाने, मेहनतीने ,तोंड ओळखीने, गोडीगुलाबीने, ज्याने स्वतःचे समाजात अस्तित्व तर निर्माण केलेच पण आपल्या बरोबरच तो इतरांचाही आधार बनला ,कष्टकरी ,धडपड्या, मिळेल ते काम करण्याची तयारी या गुणांच्या जोरावर रवी जाधव यांने समाजा स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
अन्यायाविरुद्ध लढणारा रवी म्हणून आज समाजात त्याची ओळख आहे, झोपडपट्टीत राहणारा युवा रवी आज स्वतःच्या अंग मेहनतीने, बुद्धिचातुर्याने ,दिमाखदार घरात राहतो, एवढेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही शासनाच्या विविध योजनांमधून घरे मिळवून दिली, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संपर्कात रवी आला, त्यांनी आपल्या कडून होणारी सर्वतोपरी मदत रवी जाधव यांनी केली हे रवी जाधव सांगायला कधी विसरत नाही. एम ए, एम फिल परंतु उच्च शिक्षण घेतलेला हा युवक,झालेला रवी प्रसंगी रस्त्यावर बसून धंदा करायला ही लाजत नाही, आपली रोजीरोटी कोणी हिरावून घेतली तर त्याच्याविरुद्ध त्याच पोटतिडकीने भर उन्हात उपोषण करायलाही मागेपुढे पाहत नाही, यासाठी लागते ते बळ जिद्दी, चिकाटी व आत्मविश्वासाचे हे सर्व गुण रवी कडे असल्यामुळे त्याला हे करणे शक्य होते.
आज रवी जाधव यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे, अगदी गरीबा पासून श्रीमंतांपर्यंत, शिक्षकां पासून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पत्रकार, राजकीय नेते मंडळी, पर्यंत रवी यांचा मित्र वर्ग जोडला आहे, स्वतः टेम्पोत भाजी विकून मिळालेल्या पैशातून स्वतःच्या कुटुंबासाठी पैसे काढून उरलेल्या पैशातून फुल ना फुलाची पाकळी तो गोरगरीब जनतेसाठी खर्च करत असतो.
या दोन वर्षात रवी जाधव यांना भरपूर नुकसान सहन करावे लागले, कोरोनाच्या च्या काळात रोजगार हिरावून घेतल्यामुळे रवी खूपच निराश आला होता ,मात्र उमेद हारू न देता तो तसाच या भूमीत पाय घट्ट रोवून उभा राहिला विद्युत वितरण कंपनीच्या धिकार्यांनीही त्याला वेठीस धरले त्यामुळे लाखो रुपयाचे आईस्क्रीम टाकून देण्याची वेळ रविवार आली,मात्र फिनिक्स पक्ष्यासारखा रवि पुन्हा उभा राहिला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
एका गरीब गरीब कुटुंबात दलित वस्तीत जन्मलेला रवि त्याचे आचार विचार उच्चवर्णीय लोकांना लाजवतील अशाच पद्धतीचे आहेत, गरिबाला वाटेल तेव्हा ,केव्हाही पडेल ती मदत करायची या त्याच्या स्वभावाचा मला प्रत्यय वेळोवेळी आला,रवीचा रोजगार हिरावून घेऊन त्याच्याविरुद्ध कुभांड रचले,मोक्याची जागा हिरावून घेऊन कधी नाही ते त्यावर तारेचे कुंपण घातले तरीही रवि डगमगला नाही.
आपल्या चिकाटीने ,बुद्धिचातुर्याने, रवी याने त्यावर मात केली व ज्यांनी ज्यांनी रवीला त्रास देण्याचा प्रयत्न केला व त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणले त्या अश्रुची किंमत त्यांना मोजावी लागेल हे सांगायला रवी मात्र विसरत नाही, कारणांची एक प्रसंग मला आठवतो रवी जाधव यांनी मला रात्री दहा वाजता फोन करून काही घटना सांगितली ती त्या त्याच्या शब्दात देत आहे.
१२-१२-२१,हा कालचा दिवस माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा दिवस ठरला. काल संध्याकाळी सावंतवाडी सरकारी हॉस्पिटल मधून एका पेशंटच्या नातेवाईकाचा मला फोन आला एका पेशंटला डिस्चार्ज मिळाला परंतु पेशंटची कंडिशन नाजूक असल्याकारणाने लीपबेड व एअर बेड ची अत्यंत आवश्यकता होती, त्यावेळी मी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे या आमच्या तिघांचा प्रयत्नातून त्या वस्तू त्याना मोफत मिळवून दिल्या.
त्याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव मॅडम यांचा मला फोन आला कि इंदूर वरून सावंतवाडी मध्ये जिओ च्या कामासाठी आलेले कामगारांचा ठेकेदाराशी संपर्क झालेला नसल्याकारणाने हि लोक सावंतवाडीत अडकून पडली. बिचारे दोन दिवस मुलाबाळांसह उपाशी राहिले भूक सहन न झाल्यामूळे ते लोकांकडे पैसे मागू लागले हा प्रकार यादव मॅडमने पाहिला व त्यांची चौकशी केली त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा मॅडम ने खूप हळहळ व्यक्त केली व त्या सर्वांनाच खायायला देऊन पुन्हा घरी जाण्याकरिता १०००/–रु ची मदत केली त्यावेळी मी हि माझ्या सहकाऱ्यांनाकडून म्हणजेच माजी नगरसेवक संजय पेडणेकर,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, प्राध्यापक सतीश बागवे व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काबळे यांच्याकडून प्रत्येकी रु १०००/- इतकी मदत घेतली असे ५०००/-जमवून देऊन त्यांना मी माझ्या भावाच्या टेम्पोत बसवून माजी नगरसेवक संजय पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काबळे आम्ही त्यांना कुडाळ रेल्वे टेशनला सोडलं, तेव्हा माघारी परताना एका वाहन चालकाचे वाहन रस्त्यात पंचर झाल्याने त्या वाहन चालकाला पण मदत करून त्यालाही मार्गस्थ केले.
अशाप्रकारे तीन तासांमध्ये तीन समाजकार्य करून आम्हांला एक वेगळाच आनंद मिळाला .
देणाऱ्याने देत जावे …घेणाऱ्याने घेत राहावे.. एके दिवशी घेणाऱ्याने देणार्याचे हात घ्यावे या काव्यपंक्ती प्रमाणे रवीचा हा वसा इतरांनाही उचलावा व स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहावे व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगावे म्हणजे सर्व सहज साध्य होईल ,रवी जाधव या धडपडी, बुद्धिचातुर्य ,अनेक लघु उद्योग निर्माण करणाऱ्या नवउद्योजकास कोकण लाईव्ह परिवाराकडून लाख लाख,शुभेच्छा.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

