पालकमंत्री उदय सामंत उद्यापासून जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी, दि.9 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 10 व 11 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1.05 वा. एअर इंडिया विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ,चिपी, ता. वेंगुर्ला येथे आगमन व मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. ओरोस येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात, “महा आवास अभियान ग्रामीण सन 2021-22” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेस उपस्थिती, दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोविड 19 / ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक, दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय योजनेंतर्गत भात खरेदी करण्यासंदर्भात संयुक्त बैठक, दुपारी 4.30 वा. ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, सायं.5 वा. कुडाळ शहर येथे आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत कुडाळ नगरपंचायत अंतर्गत प्रभाग निहाय शहर कविलगांव, बाजारपेठ, भैरववाडी, लक्ष्मीवाडी, श्रीरामवाडी – प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, सोईनुसार कुडाळ येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण, रात्री सोईनुसार वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.
शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रेजी सकाळी 9.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग येथे कसई – दोडामार्ग नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, सकाळी 11.30 वा. दोडामार्ग येथून मोटारीने ओरस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. शरद कृषी भवन ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आढावा व अहवाल प्रकाशन, दुपारी 2 वा. ओरोस – सिंधुदुर्ग येथून मोटारीने देवगड -जामसंडेकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. आगमन व मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन हॉल, जामसंडे येथे देवगड – जामसंडे नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, दुपारी 4.30 वा. देवगड – जामसंडे येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. शिवसेना शाखा, वैभववाडी येथे वाभवे – वैभववाडी नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, सायं. 7 वा. वैभववाडी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.
00000

