कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

खारेपाटण चेकपोस्टवर अवैद्य खैर लाकूड जप्त-वन विभागाची कारवाई

*🛑खारेपाटण चेकपोस्टवर अवैद्य खैर लाकूड जप्त-वन विभागाची कारवाई*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव*

*🎴 कणकवली,दि,:९डिसेंबर*
लांजा येथून सावंतवाडी येथे चाललेला टाटा कंपनीचा ट्रक (एम एच १०-झेड ०५६०) शेडीव किटा खैर लाकूड अवैध रित्या घेऊन जाताना आज खारेपाटण चेकपोस्ट येथे सकाळी ६. ३० च्या सुमारास खारेपाटण चेक पोस्ट येथे वन क्षेत्र अधिकरी यांनी पकडला.
या प्रकरणी वाहन चालक विलास विठ्ठल डोंगरे (राहणार देवरुख) व मालक राजेश कोलपटे (राहणार लांजा) यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी व पास मध्ये दाखवलेल्या मालापेक्षा अधिक सुमारे
१५ ते १६ घन मीटर माल गाडीत आढळून आल्याप्रकरनी वनविभागाच्या वतीने गुन्हे दाखल केला जाणार आहे. वन परिक्षेत्र कार्यालय कणकवली यांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. यात कणकवली वनक्षेत्रपाल अधिकारी श्री. घुनणकीकर, वनपरिमंडल अधिकारी अनिल जाधव, सारिक फकीर, सत्यवान सुतार, वनरक्षक संजीव जाधव, विश्वनाथ माळी, अनिल राख, अतुल खोत, अतुल सुतार, एम पी शेगावे, चंद्रिका लोहार, शिर्के आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खारेपाटण चेक पोस्ट येथे आज करण्यात आलेल्या कारवाईत सदर खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पासामध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आलेला नाही. त्यामुळे सदर खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने आपल्या ताब्यात घेतला असुन पुढील अधिक चौकशी साठी फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकारी फोंडा कार्यलय येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र घुनकीकर वनक्षेत्रपाल अधिकारी कणकवली यांनी दिली.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!