कोकणसिंधुदुर्ग

श्री दत्त मंदिर कुणकेरीत दत्तजयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व दत्त जन्मोत्सव सोहळा

*श्री दत्त मंदिर कुणकेरीत दत्तजयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व दत्त जन्मोत्सव सोहळा*

सावंतवाडी,दि.१५:- श्री दत्त मंदिर कुणकेरी(लिंगाचीवाडी) येथे दत्तजयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे चोवीसवे पारायण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम शनिवार दिनांक ११ डिसेंबर पासून सुरु झाले आहेत, शनिवार दिनांक १८ रोजी कल्याचे कीर्तन व बारा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा व महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे. यामध्ये गुरुवारी दिनांक १६ रोजी महापुरुष भजन मंडळ गोठण मालक भाई शिर्के बुवा श्री. संकेत कुडव पखवाद श्री संचित मेस्त्री तर शुक्रवारी निलेली वारकरी संप्रदाय भजन मंडळ तर शनिवारी पारंपरिक भजन मंडळ सावंतवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!