आणखीकरियरकोकणसिंधुदुर्ग

नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडता येणार

🛑राज्य निवडणूक उपायुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय, उमेदवारांची घालमेल संपली; हमीपत्र द्यावे लागणार

🛑ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांना होणारा फायदा…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग : दि. ०६ डिसेंबर – ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकरिता, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करतानाच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक होते. मात्र यात आता शिथिलता देण्यात आली असून, जात वैधता प्रमाणपत्र करिता पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करीन असे हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश ६ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जारी केला आहे.

तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करणे शक्य व्हावे, या हेतूने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र करिता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा व विहित नमुन्यातील हमीपत्र ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत दाखल करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी हा ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर जात वैधता प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा व विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या सूचनेनुसार नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!