आणखीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

पुणे जिल्हा बँक उपाध्यक्ष अर्चना घारे (परब) यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

_अचुक बातमी थेट हल्ला_

✍️ब्युरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग : दि. ०३ डिसेंबर पुणे जिल्हा बँक उपाध्यक्षा, राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे (परब) यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ आणि महिला या २ मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हा अर्ज निवडणूक अधिकारी वंदना करमाळे यांच्याकडे दाखल केल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली आहे.

अर्चना घारे (परब) या उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय असून, पुणे जिल्हा बँक उपाध्यक्ष पदावर त्या कार्यरत आहेत. पुणे जिल्हा बँक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. त्यात आजच पुणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर अर्चना घारे (परब) यांना अचानक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उमेदवारी दाखल करायला सांगत विरोधकांना धक्का दिला आहे. त्यामुळे अर्चना घारे (परब) यांच्या रुपानं पवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घातलं आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूकीत अधिक रंगत आली आहे.

अर्चना घारे (परब) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, व्हिक्टर डाँटस, विकास सावंत, विलास गावडे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेंमकर, दर्शना बाबर – देसाई आ उपस्थित होते.

*👇👇सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!