आ. भास्करराव जाधव यांच्या भेटीनंतर चिपळूणची युवासेना चार्ज..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१९: तालुका युवासेना आणि चिपळूण शहर युवासेनेच्या प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज आमदार भास्करराव जाधव यांची त्यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. श्री. जाधव यांनी ९० च्या दशकामध्ये त्यांच्या तरूणपणाच्या काळात शिवसेना रूजविण्यासाठी केलेल्या संघर्षाची अनेक उदाहरणे देवून त्यांच्यातला उत्साह वाढवला आणि त्यांना चार्ज केले.
युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते आणि शहर अधिकारी निहार कोवळे यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आ. श्री. जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा सुरू असताना आ. श्री. जाधव यांनी १९८४ पासूनचा संघर्षाचा काळ या युवकांसमोर ठेवला. काॅंग्रेसची फार मोठी मातब्बर मंडळी तालुक्यात सक्रिय असताना आणि त्यांचा प्रचंड दरारा असताना या प्रस्थापितांविरोधात उभं ठाकणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची ज्योत आमच्या नसानसात भिनलेली होती आणि कसलीही पर्वा न करता आम्ही हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवत होतो. हे करीत असताना प्रसंगी जीवावर बेतणारे अनेक प्रसंग ओढवले. तरी देखील चिकाटीने, धैर्याने सर्वांना सामोरे गेलो. घेतलेली प्रचंड मेहनत, मातब्बरांविरोधात केलेले दोन हात याचे अनेक किस्से सांगून त्यांनी युवा पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवला.
यावेळी तालुका सचिव प्रतिक शिंदे, युवती तालुका अधिकारी नेहा शिंदे, उपतालुका अधिकारी अवधूत शिर्के, सागर सावंत, ऋशिकेष नलावडे, नितीन जाबरे, संजय चांदे, उपशहर अधिकारी पार्थ जागुष्टे, खेर्डी विभाग अधिकारी विराज खताते, सावर्डे विभाग अधिकारी भूपेश सावर्डेकर, दहिवली विभाग अधिकारी शरद भुवड, ओवळी विभाग अधिकारी अवि कदम, कोंढे विभाग अधिकारी साहिल शिर्के, अखिलेष खेडेकर आदी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

