उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक श्री.सुर्यकांत आडेलकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
🛑उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक श्री.सुर्यकांत आडेलकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
🛑 एका महिलेला रक्तदान करून दिले जीवनदान…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि२९: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक श्री.सुर्यकांत आडेलकर,माणगांव यांनी “O” निगेटिव्ह दुर्मिळ रक्ताच दान करत एका महिलेला जीवनदान दिले. स्वतः च्या गाडीने म्हापसा येथे जात अँज्युलो रक्तपेढीमध्ये रक्तदान केले. पेशंट हा गोव्यात भाग्योदय रूग्णालय म्हापसा येथे उपचारार्थ दाखल झाला होता. गर्भपिशवीचे ऑपरेशन करायचे असल्यानं “O” निगेटिव्ह रक्त आवश्यक होते.गोवा येथे रक्त न मिळाल्याने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व मंगेश तळवणेकर यांना संपर्क केला. यावेळी त्यांनी या दुर्मिळ रक्तगटाच्या दात्याची सोय केली.यावेळी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिक्युरिटी म्हणून रात्रपाळी सेवा बजावणारे सुर्यकांत आडेलकर यांनी ड्युटी बजावून सकाळी म्हापसा येथे जात रक्तदान केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी बाबत सर्वत्र कौतुक होत आहे तसेच मूळ गोवामध्ये शोधाशोध करुन पण रक्त न मिळाल्याने सावंतवाडी मधून रक्तदाता उपलब्ध केल्याबद्दल देव्या सुर्याजी व मंगेश तळवणेकर यांचे नातेवाईकांनी आभार मानले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_