सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव-बाबर व सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर यांचा पन्हाळ गड ते पावनखिंड विशाळगड किल्ला प्रथम.
*सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव-बाबर व सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर यांचा पन्हाळ गड ते पावनखिंड विशाळगड किल्ला प्रथम_*
*बाबर कुटुंबिय साकारतात दरवर्षी छत्रपतींचे किल्ले*
*शिवप्रेमी मित्र मंडळ भटवाडी आयोजित किल्ले स्पर्धा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :-*
*🎴सावंतवाडी,दि,:-१७ नोव्हेंबर*
सावंतवाडी : भटवाडी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त आयोजित छत्रपती गड किल्ला बनविण्याच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला या स्पर्धेत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ स्वाती यादव-बाबर व सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर याच्या पन्हाळ गडावरुन शिवरायांची सुटका ते पावनखिंड व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले इथपर्यंत चा इतिहास निर्माण केला होता या किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापाची व त्यांनी जो ऐतिहासिक ठेवा दिला अशा गड, किल्यांची आवड निर्माण व्हावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची जागृती व्हावी या उद्देशाने भटवाडीतील शिवप्रेमी मित्रमंडळाने गड किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन कले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उदय अळवणी, सचिन धोपेश्वरकर, अभय नेवगी अरुण पणदुरकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, कोलगाव माजी सरपंच संदीप हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उदय अळवणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवप्रेमी मित्र मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बी. व्हि. मालवणकर यांनी काम पाहिले.
यावेळी या स्पर्धेतील खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेते अण्णासाहेब बाबर व स्वाती यादव (सावंतवाडी) ५००१ रूपये व शिवमूर्ती, द्वितीय क्रमांक जय गणेश बालक्रीडा मंडळ (वेंगुर्ले भटवाडी) ३००१ रूपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक फ्रेंड सर्कल (जिमखाना सावंतवाडी) २००१ रुपये व ट्रॉफी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर या स्पर्धेतील उत्तेजनार्थ सप्तरंगी ग्रुप (वेंगुर्ला) आणि मोरया ग्रुप (सावंतवाडी ) यांना रोख रकमेसह ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या स्पर्धेतील बाल गटातील प्रथम क्रमांक चिन्मय युवराज मराठे आणि व्दितीय क्रमांक प्रसाद व सक्षम खोरागडे, तृतीय क्रमांक निलेश लाखे व अमोल पाटील यांना अनुक्रमे २००१ आणि १५०१ व १००१ रुपयाच्या पारितोषिकासह ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिवप्रतिमा ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर सुभेदार यांनी तर सूत्रसंचालन विनायक गोठोस्कर, आभार विजय सावंत यांनी मानले.
*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

