तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थे बाबत भाजप पदाधिकार्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
_*🛑 तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थे बाबत भाजप पदाधिकार्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर..*_
_*🛑 अधिकारी बनले ठेकेदारांचे वकील..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-१६ :-* तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. अधिकारी हे ठेकेदारांचे वकील बनले आहेत. त्यांना वकिली करण्यात जास्त रस आहे. त्यांना साधा मैलकुली ऐकत नाही. हे अधिकारी महाशय खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत. असे गंभीर आरोप वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करत बांधकामच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सळो कि पळो करून सोडले.
ऊस शेतकरी महेशकाका गोखले यांनी करूळ घाट दुरावस्थेबाबत नग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी यांनी तालुक्यातील रस्ता डागडुजी बाबत बैठकीचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार रामदास झळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, रोहन रावराणे, पुंडलिक साळुंखे, किशोर दळवी, महेश गोखले, स्वप्नील खानविलकर, उत्तम सुतार, बाबा कोकाटे, रवींद्र गुंडये, उदय पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, नायब तहसीलदार अमित निंबाळकर, अशोक नाईक, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता ए.एस. शिवनीवार, श्री. कुमावत, उपकार्यकारी अभियंता श्री. कांबळे,श्री. सुतार, श्री. दुडीये आदी उपस्थित होते.
उंबर्डे – फोंडा रस्ता शुभारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांना 10 नोव्हेंबर पासून काम चालू करतो असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आमदारांची फसवणूक करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
करूळ घाटाचे खड्ड्यामुळे ऊस घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. आमचा ऊस तुम्हीच घेऊन जा. मग आमची काही अडचण नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. लबाड अधिकाऱ्यांच्या मिलीभगत मुळे रस्त्यांची वाट लागली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
करुळ घाटातील काम बुधवार दि. 17 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येईल. व 30 नोव्हेंबर पर्यंत ते पूर्ण होईल असे लेखी आश्वासन यावेळी अभियंता शिवनीवार यांनी दिले. तर उंबर्डे – फोंडा व उंबर्डे – भुईबावडा या रस्त्याचे दुरुस्तीचे काम 22 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन श्री. कांबळे यांनी याप्रसंगी दिले आहे.
*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_
*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*
🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*
💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*
👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_
_💁🏻♂️एकदा अवश्य भेट द्या…!_
🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_
*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

