जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सतिश सावंत,दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात फेकताहेत धुळ…महेश सारंग यांचा आरोप
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्यूज :-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी- जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सतिश सावंत, एम.के.गावडे यांनी मेळावे घेऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक सुरू केलेली आहे.
जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे चेअरमन एम. के. गावडे जिल्हा बँक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुग्ध उत्पादक संस्था व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. विश्वासराव पाटील यांना मेळाव्यात आमंत्रित करत दुग्ध उत्पादक संस्था आणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन यांचे निमंत्रण पत्रिकेवर नांव छापून दुध उत्पादक संस्था व शेतकऱ्याचे मेळावे घेत आहेत. परंतु सदरील मेळाव्यावर निमंत्रीत गोकुळ संस्थेचे चेअरमन यानी पाठ फीरवली . सदरील मेळाव्यातील गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. विश्वासराव पाटील यांच्या नावाखाली सर्व दुध उत्पादक शेतकरी उपस्थीत होते परंतु त्याची उपस्थीत नसल्याने सर्व शेतकरी भ्रम निराश झाले. गोकुळ दुध संघाच्या नावाखाली जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे चेअरमन एम. के. गावडे निवडणूका डोळयासमोर ठेवून मेळावे व भेटी तसेच सहलींचे आयोजन करत आहेत. सर्व दुध उत्पादक संस्थेना मी आवाहन करत आहे की या दोन्ही व्यक्तीपासून दुग्ध सहकार क्षेत्रामध्ये सावधगीरी बाळगण्याची गरज आलेली आहे. कारण दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहली काढून काही संस्थाना गोकुळ संघाकडे नेऊन जिल्हातील दुग्ध संस्थाना गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलले कोड रदद करण्याचे गोकुळ संघाकडे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तसेच थेट दुध जिल्हा संघाला जिल्हयातील दुध संस्थानी दुध देण्यासाठी व जिल्हा संघाकडून गोकुळ संस्थेस दुध पुरवठा करण्यासाठी जिल्हा दुध संघाकडून जिल्हा संस्थाना कोड देण्याचा घाट रचला जात आहे. हा निर्णय सर्व संस्थाना व दुध उत्पादकाना धोकादायक आहे. कारण मागील सर्व लेखाजोखा पहाता दुग्ध संघ व एम. के. गावडे यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सिंधुदुर्ग दुग्ध संघ मागील देणे कीती आहे.दुध संघाला काही संस्थेना यासंदर्भात माहीतीही आहे. कारण असे जर दुग्ध संस्थाचे गोकुळने दिलेले कोड जर रदद केले तर याचा परीणाम जिल्हयात दुग्ध संस्थावर व दुध उत्पादकावर होणार आहे. या धोरणाविषयी जिल्हयातील सर्व दुग्ध संस्थानी सावधगिरी बाळगावी व एकत्रीत येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे.. भविष्यात दुग्ध उत्पादन करताना संस्थाना कठीण होऊन संस्था अडचणीत येणार आहेत. सिंधुदुर्ग दुग्ध संघ कीती लोकांचे देणे आहे व या परीस्थीतीत गोकुळने थेट सिंधुदुर्ग दुग्ध संघाकडून दुध घेतल्यास दुध संस्थावर मोठा परीणाम होणार आहे. या दोन्ही व्यक्ती थेट गोकुळकडे जाणारे दुध बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत, सिंधुदुर्ग दुग्ध संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येणारे निर्णय दुग्ध उत्पादक संस्था व दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या हीताचे नसून ते भविष्यात अडचणी आणणारे आहेत. एम.के.गावडे यांनी आतापर्यत कीती दुग्ध संस्थाना उभारी दिली आणी यांच्याचमुळे कीती संस्थाना आधी दुध उत्पादक शेतकऱ्याना तोटा सहन करावा लागला हे सर्व जिल्हयातील संस्थाना माहीत आहे. यापुढे मी दुग्ध सहकार क्षेत्रातील यांचे सर्व अपयश आपल्या समोर आणणार आहे.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

