कोकणातील भातपिकासह आंबा काजू पिकाला होणार विशेष फायदा
🛑जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग- आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना गेली काही वर्षे लहरी हवामानाचा फटका बसत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल योजनेंतर्गत विमा उतरला होता, अशा जिल्ह्यातील २२ हजार ८५७ शेतकऱ्यांना ५१.७१ कोटींची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. यातील जिल्हा बँकेकडे ६ हजार ३०५ सभासदांना १९ कोटी ९३ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. तसेच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. तत्पूर्वी आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा गावातील सोसायट्यांमध्ये आपल्या पिकाचा विमा उतरावा असेही आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे.
कोकणात अवेळी पाऊस आणि वाढलेले तापमान यामुळे प्रामुख्याने आंबा आणि काजू पिकाचे नुकसान होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना कार्यान्वित आहे. पूर्वी या योजनेतील निकषांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना या योजनेचा फारसा फायदा होत नव्हता. मात्र माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भूसे यांची पीक विमा कंपन्यांशी चर्चा करून पीक विम्याच्या निकषात बदल केले आहेत. यात पूर्वी १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २५ मिलिमिटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळत होती. ३ निकष आता १० मिलि एवढा करण्यात आला आहे. तर सलग तीन दिवस ३७ अंशापेक्षा जास्त तापमान झाल्यास पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे, असेही सतीश सावंत म्हणाले. पूर्वी पेक्षा नुकसान भरपाई रक्कमेतही आता वाढ झाली आहे. यात जास्त तापमानामुळे पूर्वी हेक्टरी ६ हजार १०० रूरूपये नुकसान भरपाई मिळत होती. ती आता १४ हजार १०० एवढी वाढविण्यात आली आहे. याखेरीज हवामानावर आधारीत पूर्वी ३९ ठिकाणी महसूल मंडळे होती ती आता ५८ एवढी वाढविण्यात आली आहेत. चार हेक्टर पर्यंत शेती बागायती असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच योजनेत सहभागासाठी सात बारा वर आंबा आणि काजूची नोंद असणे आवश्यक आहे. यंदा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरावा असे आवाहनही जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

