Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सोनुर्ली श्रीदेवी माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

_✍️ ब्यूरोन्यूज_

🎴सावंतवाडी,दि१२नोव्हेंबर,:-
तालुक्‍यातील सोनुर्ली श्रीदेवी माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गावचे प्रमुख मानकरी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोनुरले श्री देवी माऊली देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, देवी माऊली ची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, गेली काही वर्ष या मंदिराकडे जाणारा रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवल्याने रस्ता पूर्णतः खड्डेमय व वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. एकूणच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविक भक्तांकडून याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळे रस्त्याची डागडुजी करा असे मागणे ग्रामस्थांकडून होत होते.
सदर रस्त्याला बजेटमधून मंजुरी मिळाली होती मात्र कोरोना काळात निधी उपलब्ध नसल्याने या रस्त्याचे काम रेंगाळले होते याबाबत दोन दिवसापूर्वीच देवस्थान कमिटी च्या माध्यमातून प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेण्यात आली होती यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणात बरोबरच खड्डेमय बनलेला रस्ता नूतनीकरणाची करा असे मागणी उपस्थितांनी केली होती याला प्रतिसाद देत. संबंधित ठेकेदाराला सदरचे काम तात्काळ सुरू करण्यातच्या सूचना श्रीमती चव्हाण यांनी दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज सदर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.
या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून गावचे प्रमुख मानकरी श्री राजू गावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर तसेच माजी उपसरपंच सचिन गावकर ग्रामस्थ दीपक नाईक,
जयराम गावकर,गणेश गावकर,
नंदकिशोर गावकर,संजय गावकर, गोपाळ गावकर,नागेश गावकर,
ठेकेदार वसंत परांजपे आदी उपस्थित होते.
येत्या आठ दिवसावर श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव आला आहे त्यामुळे मंदिर परिसरातील रस्त्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित काम जत्रोत्सवानंतर उत्सवानंतर मार्गी लावण्यात येणार आहे, एकुण दोन किलोमीटरच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याचे ठेकेदार श्री परांजपे यांनी सांगितले. रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!