मळगावात रविवारी प्रेरणाभूमी आयोजित संवाद यात्रा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
_✍️ ब्यूरो न्यूज_
🎴सावंतवाडी,दि१२नोव्हेंबर,:-
–डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एका खून प्रकरणी सावंतवाडी संस्थानला दिलेल्या भेटीचे प्रेरणाभूमीत रुपांतर करण्यासाठीस्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने समाजात समतेचे व एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या संवादयात्रेची सुरुवात येत्या रविवारी मळगाव येथून होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ ऑक्टोबर १९३२ रोजी एका खून प्रकरणात आरोपीचे वकील म्हणून तत्कालीन राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या समोर उपस्थित राहून आरोपींची बाजू मांडली होती व सलग तीन दिवस त्यांनी मुक्काम केला होता.त्यावेळी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतलेला होता.त्या स्थळावर सावंतवाडी नगर पालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान उभारले आहे.
या घटनेला तब्बल ८९ वर्ष पूर्ण झाल्याने जिल्हयातील आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीचे प्रेरणाभूमीत रुपांतर करण्यासाठी वरील संघटनेची स्थापना दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एक १० वर्षाचा कृती आराखडा तयार केला आहे.त्यानुसार प्रथम टप्पा म्हणून या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तर पुढील रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नेमळे येथे या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यानुसार संवाद यात्रा मळगाव येथून येत्या रविवारी दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता समाज मंदिर येथे उद्घाटन होणार आहे.सदर कार्यक्रमात मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने केले आहे.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

