वैभववाडीत मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन………….नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसिलदार रामदास झळके यांचे आवाहन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-संजय शेळके
🎴वैभववाडी,दि,१२नोव्हेंबर:-
मा.मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडील २० ऑक्टोंबर २०१९ च्या कार्यक्रमानुसार विशेष मोहिमे च्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.शनिवार दि.- १३ नोव्हेंबर २०२१ व रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ तसेच शनिवार दि. २७-११-२०२१ व रविवार दि. २८-११-२०२१ या दिवशी वैभववाडी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी ११ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत उपस्थित राहून नमुना नंबर ६,७,८,८अ चे फॉर्म वाटप करणार आहेत तसेच फॉर्म स्वीकारणार आहेत दि. १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या मुदतीत नमुना नंबर ६,७,८,८अ फॉर्म भरण्याचे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी यांच्याकडून करण्यात येत आहे.त्यानुसार वैभववाडी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार ,वंचित घटक, संस्था, महाविद्यालयांमधील तरुण, नव मतदार महिला, मतदार नोंदणी स्वयंसहाय्यता गट, शहरी भाग तसेच विशेष शिबिरांचे आयोजन तालुक्यात करण्यात येणार आहे दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सकाळी ११ वाजता तर दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे सकाळी १० वाजता मतदार नोंदणी कार्यक्रम पार पडणार आहे.महाविद्यालयातील मुलांना नमुना नंबर ६ चे वाटप करण्यात येणार आहे त्याच प्रमाणे मा.भारत निवडणूक आयोगाच्या nvsp.in या वेबसाईटवर किंवा या बाबत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच voter helpline app वर फॉर्म कसे भरावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि.१ जानेवारी २०२२रोजी अठरा वर्षे पूर्ण होत आहेत अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म यावेळी भरून घेण्यात येणार आहेत.
शिवाय दि.१६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्यातील अचिर्णे, एडगाव, उंबर्डे, कोकिसरे, कोळपे, करुळ, कुर्ली, लोरे नं २, नावळे, नानिवडे, नापणे, नाधवडे, नेर्ले, तिथवली, जांभवडे, मांगवली, भुईबावडा, सोनाळी, सडुरे, वेंगसर, सांगुळवाडी, कुसुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात तर दुपारी ३ वाजता अरुळे, आखवणे, ऐनारी, उपळे, कुंभवडे, गडमठ, निम अरुळे, तिरवडे तर्फे सौंदाळे,तिरवडे तर्फे खारेपाटण, हेत, मौदे, खांबाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदरच्या कार्यक्रमा अंतर्गत भरण्यात आलेल्या फॉर्म नुसार मतदार नोंदणीची अंतिम मतदार यादी दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तालुक्यातील नव मतदारांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

