Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे कामाला उद्यापासून १३ नोव्हेंबरपासून सुरवात……..सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक यांची माहीती

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-संजय शेळके

🎴वैभववाडी,दि१२नोव्हेंबर,:-

उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम उद्यापासून १३ नोव्हेंबर ला सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार पाहणी केली.खड्डे बुजवून हे काम होणार असल्याचे सौ.नाईक यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतणीकरण कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ७६ लाख रुपये मंंजुर झाले आहेत.त्यामध्ये १९ किमी लांबीच्या रस्त्याचे काम करायचे आहे. मात्र हे काम करीत असताना रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून हे काम करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे मंगेश लोके यांनी केली होती. येथील कार्यकारी अभियंता यांनी खड्डे बुजवून काम करणे शक्य नसल्याचे सांगत, खड्डे बुजविण्यासाठी निधीच उपलब्ध होणार नसल्याचे विधान केले होते. रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी खड्डे बुजविणे गरजेचे असल्याचे मंगेश लोके यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अधिक्षक अभियंता यांना या संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सौ.नाईक यांनी शुक्रवारी उंबर्डे ते फोंडा या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली.या रस्त्याचे खड्डे डांबराने बुजवून व गटार मारून रस्ता सुस्थितीत करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे,बँक संचालक दिगंबर पाटील,कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, उपअभियंता कांबळे, शाखा अभियंता धुडये,शाखा अभियंता श्री. सुतार,ठेकेदार सुधाकर साळुंखे,देवानंद पालांडे आदी उपस्थित होते

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!