_गेल्या बारा वर्षांमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी जनतेची फसवणूक केली….संजू परब
*_गेल्या बारा वर्षांमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी जनतेची फसवणूक केली….संजू परब_*
*_🛑खोटी आश्वासने देऊन यापुढे निवडणुकी जिंकता येणार नाही.._*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि,:-* मतदार संघात रोजगार देणारे उद्योग आणणार असे सांगून गेल्या बारा वर्षांमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी जनतेची फसवणूक केली आहे आजही ते खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत मात्र यापुढे खोटी आश्वासने देऊन त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही येत्या पालिका निवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव करू ही पांढऱ्या दगडावरची काळी रेघ असल्याचे भाजपा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे सांगितले.
तर केवळ नारळ फोडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत नाही, भविष्यात पालिकेच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात नक्कीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारू असा आशावाद व्यक्त करत मालकीहक्क असलेल्या उत्तम स्टील प्रकल्पाची जमीन काढून घेण्याची भाषा केसरकरांनी करू नये अशी टीकाही श्री परब यांनी यावेळी केली.
पालिकेच्या नगराध्यक्ष दालनात संजू परब यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले, प्रशासनाचे ज्ञान असताना आमदार दीपक केसरकरांना खोटे बोलणे शोभत नाही त्यांनी बांदा दोडामार्ग रस्त्यावरून ठेकेदारांना ब्लॅकमेल करून पत्रकार परिषद घ्यायला लावली अशाप्रकारे ठेकेदारावर दबाव आणून त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, हातात पालकमंत्री आणि अर्थ खाते असताना त्यांनी या रस्त्यासाठी निधी आणला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. गेली तीन वर्षे त्यांना बांदा दोडामार्ग रस्त्याचा प्रश्न सोडवता येत नाही ते आणखी कोणती विकास कामे करणार आजपर्यंत केवळ दिवाळीमध्ये फटाके फोडतात त्याप्रमाणे त्यांनी आश्वासनांचे फटाके फोडले आहेत. काथ्या उद्योग भात गिरण, सेट अप बॉक्स, चष्मा कारखाना यापैकी एकही उद्योग या ठिकाणी आला नाही केवळ जॅकी श्रॉफला आणून जमिनीची दलाली करण्यापलीकडे केसरकर यांनी याठिकाणी काही केले नाही.
श्री परब पुढे म्हणाले, उत्तम स्टील प्रकल्पाची जमीन काढून घेण्याची भाषा केसरकर करत आहे मात्र त्या ठिकाणी संबंधित कंपनीची मालकी जागा आहे हे सुद्धा केसरकर यांना माहित नाही शिरशिंगे धरणाबाबतही ते आश्वासन देत आहे हे केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे त्या ठिकाणी नारळ फोडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन नाही आमदार केसरकर यांनी दिले मात्र त्याठिकाणी जमीन कोणाची आहे हे सुद्धा आमदारांना माहीत नाही त्यामुळे भविष्यात पालिकेच्या माध्यमातून शहरांमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल िश्चितपणे बांधला जाईल.
सावंतवाडी पालिकेला विकास कामासाठी निधी देताना पालकमंत्र्यांकडून सूडबुद्धी चे राजकारण केले जात आहे आज पर्यंत विकास कामासाठी मिळणारा सर्व निधी दडवून ठेवण्याचे काम पालकमंत्री करत आहेत मात्र निधी अडवला तरी विकास काम थांबणार नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून शहराचा नक्कीच विकास केला जाईल. येणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ती सरकारांचा पराभव ही पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे, केवळ संस्कृती या विषयावर केसरकरांना आता निवडणूक जिंकता येणार नाही मात्र बेरोजगारी या विषयावर भाजपा नक्कीच निवडणूक जिंकणार असा विश्वासही श्री परब यांनी बोलून दाखवला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

