नेतर्डे भजन स्पर्धेत स्वराभिषेक मणेरी संघ प्रथम
🛑श्री राष्ट्रोळी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप
🎴नेतर्डे:- सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री देव राष्ट्रोळी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित खुल्या भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळ द्वितीय तर माटणेच्या श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री राष्ट्रोळी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने खुली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तुळस येथील स्वामी समर्थ मठाचे मिलिंद शेटकर महाराज, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विलास सावंत, अनिल सरमळकर, गणपत गवस, देवेंद्र गवस, दुलाजी गवस उपस्थित होते. स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धे दरम्यान एकापेक्षा एक सरस भजने सादर करण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी, द्वितीय श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, तृतीय श्री सातेरी पुरावतारी भजन मंडळ माटणे, उत्तेजनार्थ श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मेणकुरे डिचोली, शिस्तबद्घ संघ – श्री सातेरी पुरमार भजनी मंडळ धुमासे गोवा, उत्कृष्ट गायक – चैताली चंद्रकांत परब (साळ गोवा), उत्कृष्ट गौळण गायक – समीर शिरोडकर (माटणे), उत्कृष्ट हार्मोनियम वादक – समीर नाईक (मणेरी), तबलावादक – जानू शिरवलकर (माटणे), पखवाजवादक – भावेश राणे (सांगेली), झांजवादक – साहिल नाईक (मळेवाड), कोरस – कलासाधना संगीत संस्था हणखणे गोवा, उत्कृष्ट श्रोता – उल्हास गवस.
सर्व विजेत्या स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत व उद्योजक आनंद गवस यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शामसुंदर गवस, रविंद्र गवस, उपसरपंच प्रशांत कामत, विलास गवस, दुलाजी गवस, पुंडलिक नाईक, दीपक नाईक, रामदास नाईक, निळकंठ गवस, सखाराम गवस, सत्यनारायण गवस, मुकुंद नाईक, सुनील गवस उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण निलेश मेस्त्री व रोहिदास परब यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक गवस, अरविन्द गवस, गौरेश गवस, तातोबा गवस, प्रशांत गवस, समीर गवस, अंकित गवस, शुभम गवस, प्रकाश गवस, घनश्याम गवस, रामदास गवस आदींसह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन. डी. कार्वेकर, प्रास्ताविक रामदास नाईक तर आभार विवेक गवस यांनी मानले. शेकडो भजनप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेतला.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

