निष्क्रिय पालक मंत्री व आमदारांना मुळे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांचे खड्डेमय स्वागत-बाळा पालेकर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि,८नोव्हेंबर:-
निष्क्रिय पालक मंत्री व आमदारांना मुळे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांचे खड्डेमय स्वागत-बाळा पालेकर
प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटात दानोली पासून नांगरतास धबधबा व गडदूवाडी पर्यत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून तीन वर्षापुर्वी केलेल्या या रस्त्याच्या निविदे मध्ये जोखीम कालावधीत डागडुजी व खड्डे भरण्यासाठी निधीची तरतूद असते. तो निधी वापरण्यात यावा अशी मागणी उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी केली असून बांदा दोडामार्ग रस्त्याबाबत ठेकेदारांनी दाखवलेली माणुसकी व आमदार दिपक केसरकर यांनी थंड भाषेत दिलेली समज या ठिकाणीसुद्धा दाखवावी त्यामुळे वाहनधारकांना थोडा दिलासा मिळेल. देशभरात पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळगावहून येणारे पर्यटक व पूणे मुंबईहून येणारे पर्यटकांना आंबोलीत सिंधुदुर्गच्या हद्दीवर मोठमोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत असून प्रवेशद्वारावरील ही परिस्थिती बघता इतर पर्यटन स्थळा वरील रस्त्यांची काय दूर्दशा असेल असे मत पर्यटक व्यक्त करीत आहेत. आणि या सर्व परिस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निष्क्रिय पालकमंत्री व आमदार जबाबदार असल्याचा आरोप आंबोली सरपंच व भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा पालेकर यांनी केला आहे पालकमंत्री आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा झोपा काढण्याचेच काम करत असल्याचे पालेकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले. आणखी महिनाभरात नववर्ष व नाताळनिमित्त पुन्हा एकदा या रस्त्यांवर पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे आणि तत्पूर्वी खड्डे न बुजवल्यास पालक मंत्री व आमदार यांच्या नावाने “खड्डेमय सिंधुदुर्गात पर्यटकांचे हार्दिक स्वागत” असे फलक लावण्यात येतील असा इशारा देखील आंबोली सरपंच बाळा पालेकर व उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी दिला आहे.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

