कोकणसामाजिक

साटम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आमची एकजूट च्या वतीने २४ व्या विशेषांकांचे आज झाले प्रकाशन

 

मान्यवरांनी केले आमची एकजूट चे कौतुक

सावंतवाडी, दि.साटम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आमची एकजूट च्या वतीने २४ वा विशेषांकांचे आज झाले प्रकाशन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी च्या कोकण महिला अध्यक्ष अर्चनाघारे परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी पं. स. सदस्य राघोजी सावंत, पुंडलिक दळवी, नितीन मांजरेकर,आमची एकजूट आणि कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित आमची एकजूट च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. जवळपास २४ वर्षे आमची एकजूट च्या माध्यमातून साटम महाराज यांचे महत्व विशेषांक च्या माध्यमातून सर्वापर्यंत पोहचवायची सेवा सीताराम गावडे यांच्या माध्यमातून होत आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे असे मत अर्चनाघारे परब यांनी व्यक्त केले..
२४ वर्षे पूर्ण यंदा विशेषांकला झाली पुढची अजून ५० वर्षे असेच विशेषांक अविरत पणे सुरु रहाव्या अशा शब्दात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना व्यक्त केले.
तसेच यावेळी पत्रकार अभिमन्यू लोंढे,अनंत जाधव,शैलेश मयेकर,रामचंद्र कुडाळकर,हरिश्चंद्र पवार, दिपक गावकर,कोकण लाईव्ह ब्रेकिंग चे विशाल पित्रे, भिकाजी धोंड, प्रशांत मोरजकर, प्रियांका गावडे आमची एकजूट चे प्रशांत बिरोडकर, संयुक्ता गावडे, सागर गावडे यासह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!