गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी कोलगावचा तरुण ताब्यात..
_*🛑 गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी कोलगावचा तरुण ताब्यात..*_
_*🛑 एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴बांदा, दि-३० :-* गोवा राज्यातून बांदा – दाणोलीमार्गे सावंतवाडीत बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या कारवर (एमएच १७ क्यू ०८८०) धडक कारवाई करत एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूच्या एकूण ८९८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सनी सत्यवान पवार (४०, भोमवाडी, कोलगाव) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक डॉ. तडवी, निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.
*……………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

