Uncategorized

हलाल मुक्त दिवाळी अभियानात सहभागी होऊन हलाल प्रमाणित उत्पादनावर बहिष्कार घालवे- रमेश शिंदे ,राष्ट्रीय प्रवक्ते हिंदू जनजागृती समिती

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी-  सध्या भारतीय धर्मांधनांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी धर्मांध करत आहेत. त्यासाठी व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध  संघटनेकडून दिले जाते. या हलाल अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. या अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची  बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ
बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी याविषयी मा. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी  सावंतवाडी तहसिदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी हिंदुजनजागृती समितीचे चंद्रकांत  बिले , जीवन केसरकर , सावंतवाडी शिवसेना विभाग प्रमुख नामदेव नाईक, निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले कि. १. भारत सरकारने शरीयत आधारित ‘इस्लामिक बँक’ भारतात चालू करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे थेट धर्माच्या आधारावर निधी गोळा करण्याची नवी शक्कल धर्मांधांनी लढवली. कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याचा आधार घेत धर्मांधानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
२. देशात केवळ १५ टक्के असणार्‍या अल्पसंख्य धर्मांध  समाजाला इस्लामनुसार संमत ‘हलाल मांस’ खायचे आहे, म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले आहे. आता तर हे ‘हलाल प्रमाणपत्र’ केवळ मांसापुरते मर्यादित न राहता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल यांसाठीही लागू केले जाऊ लागले आहे. ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधनांचा समावेश आहे. यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या आधारे मांसासह या अन्य पदार्थांचा व्यवसायही हिंदु उद्योजकांकडून बळकावला जात आहे.
३. ही मागणी आता केवळ खासगी आस्थापनांपुरती मर्यादित न रहाता यात निधर्मी भारत सरकारची रेल्वे सेवा आणि ‘पर्यटन महामंडळ’ यांतही ‘हलाल’ अनिवार्य करण्यात आले आहे. ‘भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे’, असे सांगितले जाते. असे असतांना केवळ ‘इस्लाम’ला मान्य असलेली उत्पादने रेल्वे आणि एअर इंडिया यांमध्ये कशी काय विकली जाऊ शकतात ? अशा प्रकारे एखाद्या हिंदू उद्योजकाने एखादे उत्पादन चालू करून त्यांनीच प्रमाणित केलेल्या वस्तू घ्याव्यात, असा निर्णय बंधनकारक केल्यास शासनाच्या रेल्वे आणि एअर इंडिया यांच्यासारख्या सरकारी आस्थापनांना ते मान्य होईल का ?
४. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’, तसेच प्रत्येक राज्यात स्वतंत्र अशी ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभाग अस्तित्त्वात आहे. एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ शासनाची व्यवस्था असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे ? याचसमवेत सरकार जेव्हा अशा पदार्थांना प्रमाणपत्र देते, तेव्हा त्याची चाचणी घेतली जाते. ‘हलाल’चे प्रमाणपत्र देतांना मात्र शासनाचे कोणतेही बंधन पाळले जात नाही. असे असतांना धार्मिक आधारावर एखाद्या खासगी संस्थेकडून हलाल प्रमाणपत्राच्या नावे केली जाणारी शुल्क आकारणी वैध का ठरवली जात आहे ? या खाद्यपदार्थांमधून कोणाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
५. हलाल उत्पादनांतून लाभ मिळवायचा आणि तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वृद्धीसाठी वापरायचा, तसेच इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यायचे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचा. असे केल्यामुळे संपूर्ण साखळीवर त्यांचे नियंत्रण राहिल्याने इस्लामिक बँकेच्या स्थितीत लक्षणीय पालट झाला. बँकेच्या संपत्तीत वर्ष २००० मध्ये असलेल्या ६.९ टक्क्यांवरून वर्ष २०११ मध्ये २२ टक्के इतकी वृद्धी झाली. ‘हलाल इंडस्ट्री’ जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणारी व्यवस्था बनली आहे. अर्थात इस्लामच्या आधारे ‘हलाल इंडस्ट्री’ आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारे ‘इस्लामिक बँक’ मोठी बनत चालली आहे.
६. भारतात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या अनेक खाजगी संस्था आहेत. त्यात प्रामुख्याने ‘हलाल इंडिया प्रा. लिमिटेड’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ यांचा समावेश आहे.
७. मुसलमान व्यक्तीने मिळवलेले मांसच हलाल मानले जात असल्याने मांसाचा ६३,६४६ कोटी रुपयांचा व्यापार मुसलमानांकडे गेला आहे. त्यामुळे हिंदु खाटीक समाज आणि हिंदु व्यापारी बेरोजगार बनत चालले आहेत.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ संघटनेविषयी
भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही एक मुख्य संघटना आहे. भारतात ब्रिटिशांच्या राजसत्तेला विरोध करण्यासाठी वर्ष १९१९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. काँग्रेससह ही संघटना कार्यरत होती आणि तिने फाळणीला विरोध केला होता. फाळणीच्या वेळी या संघटनेचे २ तुकडे होऊन त्यातील ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ या संघटनेने पाकिस्तानचे समर्थन केले होते. आज ही शक्तीशाली मुसलमान संघटना म्हणून ओळखली जाते.
नुकतेच या संघटनेचे बंगालचे अध्यक्ष सिद्दीकुल्ला चौधरी यांनी ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या विरोधात ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विमानतळाच्या बाहेर पडू देणार नाही’, अशी धमकीही दिली होती. याच संघटनेने उत्तरप्रदेशमधील हिंदु नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे खटले लढण्याचे घोषित केले होते. या संघटनेने ७/११ चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, २६/११ चे मुंबईवरील आक्रमण, मुंबईतील झवेरी बाजारातील साखळी बॉम्बस्फोट, देहलीतील जामा मशीद स्फोट, कर्णावती (अहमदाबाद) शहरातील स्फोट अशा अनेक आतंकवादी घटनांतील मुसलमान आरोपींसाठी कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले आहे. अशा एकूण ७०० जणांचे खटले जमियत लढवत आहे. यासाठीचा लागणारा निधी हलाल प्रमाणपत्रांद्वारे हिंदूच त्यांना मिळवून देत आहेत. याचा अर्थ हलाल निधीचा वापर आतंकवादाच्या आरोपींना साहाय्य करण्यासाठी होत आहे, हे स्पष्ट आहे.

तरी या संदर्भात आम्ही पुढील मागण्या करत आहोत…
१. केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, तसेच मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना ‘हलाल प्रमाणित’ पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर भारतात बंदी आणावी.
२. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करण्यात यावी.
३. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया या सरकारी आस्थापनांमध्ये ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच पुरवले जातात, ही व्यवस्था त्वरित बंद करावी.
४. ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का, याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

 

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!