बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित..
_*🛑 बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴सावंतवाडी, २७ :-* महिला दिनाचे औचित्य साधून जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या अलौकिक कार्याप्रती दिला जाणारा यावर्षीचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२१ शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल बांदा नं .१ शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सरोज नाईक यांना वितरित करण्यात आला.
नुकताच विद्यानिकेतन पाचगणी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अणासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाबळेश्वर- वाई विधानसभा क्षेत्राचे आमदार मकरंद पाटील ,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे ,पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर ,सातारा जिल्ह्याच्या नगराध्यक्षा माधुरी कदम आधी विविध मान्यवरांच्या हस्ते सरोज नाईक यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बांदा नवभारत संस्थेचे सचिव शरद नाईक केंद्रप्रमुख संदीप गवस ,उपशिक्षक जे .डी पाटील, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेले दीड वर्षाहून अधिक काळा शाळा बंद असताना मुख्याध्यापिका सरोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा केंद्रशाळेत ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रमांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात आली होती .तसेच या कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव शाळेमध्ये करून विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यात तसेच सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड झाली होती. सरोज नाईक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायार यांनी शाळा भेटी वेळी बांदा शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचे अभिनंदन केले .
*……………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

