कृषिकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीय

ब्लु लाईन रेड लाईन वस्तुस्थिती नागरिकांनी समजून घ्यावी अधिवेशनात आवाज चर्चा करणार : आ.भास्करराव जाधव

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:- ओंकार रेळेकर

🎴चिपळूण- नागरिकांना आवाहन आहे की रेड लाईन आणि ब्लु लाईन संदर्भात वास्तुस्थुती काय आहे ते जाणून घेतले पाहीजे त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे या लाईनचा मुळात २२ जुलै रोजीच्या महापुराशी काहीही संबंध नाही पूररेषा निश्चित करा हा निर्णय सरकारचा २०१४ चा आहे. ब्लू व रेड लाईनचा विषय अद्याप राज्य सरकारच्या हातात असून यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वांना बरोबर घ्यायला हवे. चिपळूण बचावसाठी जन आंदोलन किंवा जल आंदोलन करु नये. आपण याबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. भास्करराव जाधव यांनी सांगितले.
पूररेषा संदर्भात नागरिकांमध्ये सध्या समज गैरसमज निर्माण झाले आहेत या संदर्भात आता माजी मंत्री आमदार भास्करराव जाधव यांनी संपूर्ण विषयाची माहिती घेऊन लक्ष टाकले आहे.सोमवारी आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदमध्ये आ.जाधव यांनी या बाबत माहिती दिली. २२ जुलैचा पूर आला आणि त्या पुरामुळे लाईन मारली गेली असं सांगितलं जातंय ही वस्तुस्थितीच नाहीये मुळामध्ये पुराचा आणि लाईन चा काडीचाही संबंध नाही चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापूरात हजारो कुटुंबे भरडली गेली. त्यांचे संसार उद्स्थ झाले. सध्या पुररेषेवरून सातत्याने आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. आत्मदहन करण्याचेही जाहीर केले जात आहे. मात्र ही पुररेषा केवळ चिपळूणसाठी जाहीर झालेली नाही. जिल्ह्यातील विविध नद्यांसाठी ती लागू झालेली आहे. या विरोधात लढा देण्यासाठी जनमताचा रेटा लावायला हवा. राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील लोकप्रतिनीधी व जनतेलाही सोबत घ्यायला हवे. तरच व्यापक जनमत तयार होईल. येत्या हिवाळी अधिवेशनाही आपण पुररेषेचे विषय लावून धरणार आहोत. पुररेषेबाबत अजुनही वेळ गेलेली नाही. राज्यसरकारच्या अखत्यारीत हा विषय असून त्यावर विधीमंडळात योग्य निर्णय घेतला जाईल, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
आमदार भास्कर जाधव म्हणाले, कोकणात अनेकवेळा आपत्ती आली. मात्र कोकणी माणूस कधी डगमगला नाही. आपत्तीमुळे कधी कोकणात आत्महत्या होत नाही. मात्र पुररेषेमुळे गेल्या काही दिवसात आत्महत्येचे इशारे दिले जात आहेत. हे वेदनादायी आहे. जलसंपदा विभागाकडून गेल्या २५ वर्षातील पुराचा अंदाज घेऊन निळी रेषा जाहीर झाली. तर पुढील १०० वर्षाचा विचार करून लाल पुररेषा जाहीर करण्यात आली. या पुररेषा जगबुडी नदी (खेड),शास्त्रीनदी (संगमेश्वर), कोदवली (राजापूर), काजवी (रत्नागिरी), मुंचकुडी (लांजा) येथेही लागू झालेल्या आहेत. मात्र केवळ चिपळूणातून पुररेषे आवाज उठवला जात आहे. पुररेषा निश्चीत करण्यासाठी २०१८ मध्ये निवीदा काढण्यात आली. एका खासगी एजन्सीला ते काम मिळाले. मे २०२० मध्ये हे काम पुर्णत्वास गेल्यानंतर सहा महिन्यापुर्वी शहरात लाल व निळी पुररेषा मारण्यात आली. महापूर आल्यानंतर पुररेषे इतकेच पाणी भरल्याने त्याविषयीचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. जाहीर झालेली ही पुररेषा वाशिष्ठीच्या उगम स्थानापासून लागू होते. पुररेषा जाहीर झाल्यावर हरकती मागवून काय उपयोग नाही. त्यावर सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. यासाठी पुररेषा लागू असलेल्या तालुक्यांना संघटीत करून व्यापक लढा द्यायला हवा. तरच त्याची दखल घेतली जाईल. विधीमंडळातच यावर निर्णय होणार आहे. तिथे आपण नक्कीच आवाज उठवू. केंद्राचेही २३ नोहेंबर पासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. तिथेही येथील खासदार आपली मते मांडतील. विधीमंडळात चर्चा झाल्यावर मार्ग निघू शकतो. आता हताश होऊन चालणार नाही. जनमताचा रेटा लावावाच लागेल. जनतेचाही लोकप्रतिनिधींवर दबाव यायला हवा. नद्यातील गाळ हा काढावाच लागणार आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!