कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 गोवा बोर्डरवरील पोलिसांच्या गेट खाजगी गोवा बसेससाठी खुल्या करण्यासाठी बाबुराव धुरी आक्रमक..

 

_*🛑प्रशासनाला दिली उद्याची डेडलाईन..*_

_*🛑 सकाळी ११ वाजेपर्यंत गेट खुली न केल्यास स्वत: रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२०:-* दोडामार्ग तालुक्यात गोवा ते दोडामार्ग व दोडामार्ग ते गोवा प्रवास करणार्‍या गोव्यातील खाजगी बसेसना उदया ११ वाजेपर्यंत गेट खुल्या करून द्याव्यात अन्यथा त्या पोलिस गेट स्वत मैदानात उतरून शिवसेना स्टाईलने खुल्या करू असा रोखठोक इशारा शिवसेनेचे तालूकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दीला आहे. गोव्यातून खाजगी वाहने व मनसे जर दोडामार्ग महाराष्ट्रात येत असतील तर वाहनांना कोरोंना आहे का ? असा संतप्त सवाल धुरी यांनी उपस्थित करत झाले तेवढे खूप झाले. उद्यापासून गोवा ते दोडामार्ग इंब्रांमपूर बसेस नियमितपणे दोडमार्गात आल्याच पाहिजेत अन्यथा आम्ही आणू असा आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना व जिल्हा प्रशासनाला आव्हान दिल आहे.

दोडामार्ग मधील गोवा बॉर्डरवर जिल्हा प्रशासनान कार्यान्वित केलेल्या पोलिस गेट वरुन गोव्यातील प्रवाशांसाठी, कामगार वर्गासाठी  लाईफलाईन असलेल्या दोडामार्ग इंब्रांमपूर ते म्हापसा या खाजगी बसेसना अध्याप दोडामार्ग मध्ये प्रवेश दिला जात नाही. सर्व प्रवाशी , खाजगी वाहने व माणसे ये-जा करू शकतात मग बसेस बंद करून प्रशासनाला नेमक काय दाखवायच आहे. त्यामुळे झाले तेवढे खूप झाले. आता येथील नोकरदार वर्ग व प्रवाशांची हेळसांड नको यासाठी गोवा बोर्डरवरील ती पोलिस गेट उद्या गुरवारी सकाळी ११ वाजण्याच्या आत वाहनांसह खुली करा अन्यथा त्यांनंतर  मैदानात उतरून त्या गेट मला खुल्या करव्या लागतील असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर खाजगी बस वाहक व मालक यांनी न घाबरता माझ्या तालुक्यातील प्रवाशांना बिनधिक्कत दोडामार्ग महाराष्ट्र हद्दीत यावे आपण तुमच्या सोबत आहोत असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!