कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 खासगी वाहनातून विशेष मोहिमेवर आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकावर ग्रामस्थांकडून हल्ला झाल्याची खळबळजनक घटना..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : संजई भाईप*

*🎴बांदा, दि-२१ :-* खासगी वाहनातून विशेष मोहिमेवर आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकावर पेडणे सरंबळ येथे काही ग्रामस्थांकडून हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. यात उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पैकी एका कर्मचाऱ्यावर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पेडणे पोलीसांनी दोघा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील भरारी पथक मंगळवारी रात्री पेडणे तालुक्यात दाखल झाले. सदर पथक खाजगी गाडी घेऊन आले होते.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर संशय आल्याने त्यांच्याकडून ओळखपत्र मागितले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. सदर कर्मचारी चोर असल्याचा संशय अधिक बळावला. यावेळी ग्रामस्थ व त्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बघता बघता याचे रुपांतर झटापटीत झाले. या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यातील एक कर्मचारी गोवा बांबोळी येथे उपचार घेत असून दुसऱ्या कर्मचाऱ्याला पुणे येथे पाठवण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पेडणेतील दोघां दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!