🛑 देवसू ग्रामपंचायत उपसरपंच पदी रविंद्र सावंत यांची आज बिनविरोध निवड..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴देवसू, दि-२० :- ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री रविंद्र परशुराम सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली. आज रोजी खास सभेमध्ये उपसरपंच निवडीच्या वेळी देवसु सरपंच सौ. संजना संताेष सावंत, गामसेविका साै स्वाती कदम, गामपंचायत सदस्य विजय मेस्त्री, अपर्णा सांवंत, सुचित्रा नाईक, नवनिर्वाचित उपसरपंच रविंद्र परशुराम सावंत, गामपंचायत कर्मचारी अशाेक सावंत, नळ कामगार सुनिल सावंत,गामपंचायत लिपीक साै रसिका सावंत डाटा आेपरेटर सावंत हे हजर होते.
निवडणूक प्रक्रिया पार पडतात उपसरपंच रविंद्र परशुराम सावंत यांचे तालुकाप्रमुख श्री रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, उपतालुकाप्रमुख श्री संदीप माळकर, विभाग प्रमुख श्री आबा केरकर, ओवळीये सरपंच श्री अबजू सावंत व देवसू शाखाप्रमुख श्री गोविंद सावंत यांनी अभिनंदन केले.या अगाेदर काेराेना मु़ळे उपसरपंच महादेव बाबुराव सावंत यांचे निधन झाल्या मुळे हे पद रिक्त झाले होते.

