🛑 २३ लाख लूटीचा २४ तासात छडा लावणाऱ्या वैभववाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल जाधव यांचा अमदार नितेश राणे यांनी केला सत्कार..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-२० :-* २३ लाख लूटीचा २४ तासात छडा लावणाऱ्या वैभववाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल जाधव यांचा आमदार नितेश राणे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार केला. यावेळी सभापती अक्षता डाफळे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, बापी मांजरेकर, गुलाबराव चव्हाण, दिलीप रावराणे, विकास काटे, प्राची तावडे, शुभांगी पवार, स्नेहलता चोरगे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर, प्रदीप नारकर, सुनील भोगले, संजय सावंत, उदय पांचाळ, पोलीस नाईक अभिजीत तावडे, वाहतूक पोलीस श्री. राठोड, पो.ना. मारुती साखरे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 23 लाख चोरीच्या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
एटीएम कर्मचारी हे वैभववाडी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये भरण्यासाठी हे पैसे घेऊन येत होते. दरम्यान त्या कर्मचाऱ्यांनीच बनाव रचत चोरी झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सर्व दिशेने तपास करत २४ तासात घटनेचा छडा लावला. आरोपींच्या मुसक्या आवळल्या. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी आमदार नितेश राणे यांना सांगितली. केलेल्या कामगिरी बद्दल आमदार नितेश राणे यांनी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व सर्व टीमचे अभिनंदन केले.

