कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

संत साहित्याची शिकवण शाश्वत- डॉ.अनिल कांबळी

🔸सावंतवाडीत रंगले कोजागरी काव्यसंमेलन…

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी-* “संत साहित्यिकांनी आपल्याला दिलेले साहित्य हेच शाश्वत साहित्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,चोखोबा, बहिणाई यांच्यापासून सानेगुरुजींपर्यंत सर्वच महानुभवांनी आपल्याला जीवनातील स्वानुभवातून निर्माण केलेलं साहित्य संस्कार दिलाय, तो आपण जपावा”, असे प्रतिपादन कोजागरी कवी
संमेलनाध्यक्ष डॉ.अनिल कांबळी यांनी केले.
सिंधुदुर्ग साहित्य संघ, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही कोजागरी कवी संमेलन सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात कविवर्य केशवसुत सभामंडपात आयोजित करण्यात आले होते. यावेळी कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल धाकू कांबळी होते. व्यासपीठावर कोल्हापूर येथील नव्या पिढीचे मान्यताप्राप्त लेखक किरण गुरव, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे संत तुकाराम अभ्यासनचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे, प्रा. प्रवीण बांदेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.कांबळी म्हणाले की,
कविता समजून घ्यायला अर्ध आयुष्य संपले, कविता ही मानवी मनाची उत्कट अभिव्यक्ती, माता पित्यांचे संस्कार, बालपणी खेळातून आलेले अनुभव, आपल्याला मिळालेले मूलभूत ऊर्जात्मक संस्कार, ताबडतोब प्रतीक्षेपीत प्रतिक्रिया, ही प्रतिक्रिया एक तर ओवीतून नाहीतर शिवीतून व्यक्त होते, तीच असते मग मनातून आलेली कविता असते, असे मत डॉक्टर कांबळी यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की, सावंतवाडी आणि कोल्हापूर यांचे नाते अत्यंत ऐतिहासिक आहे. सावंतवाडीच्या साहित्यिकांचा कोल्हापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत मौलिक वाटा आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या साहित्यिकांच्या ऋणानुबंधातून साहित्य चळवळ चांगल्या पद्धतीने निर्माण होत आहे. हे ऋणानुबंध येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच दिशादायक ठरतील.
कवी किरण गुरव, डॉ.नंदकुमार मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कवी संमेलनाची सुरुवात ‘अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना..!’ या कविवर्य वसंत सावंत यांच्या गीताने झाली. प्रा. केदार म्हस्कर यांनी गायनातून सादर केलेल्या कवितेतून रसिक मंत्रमुग्ध झाले. यानंतर कवी संमेलनात सहभागी झालेल्या कवी-कवयित्री यांनी आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून कवी संमेलनात रंगत आणली. यात सर्वप्रथम सिंधुदुर्गचे सुपुत्र व जेष्ठ कवी दादा मडकईकर ‘पळस फुललो रानात, मनात ‘, प्रा.सुचिता गायकवाड (कणकवली ) यांनी महिलांची होणारी घुसमट आपल्या स्वरचित ‘मी संसार करीत राहिले ‘ ह्या कवितेतून मांडली. दीपक पटेकर ‘वेदना अंतरीच्या ‘ दीपक तळवडेकर ‘तुमच्या अस्तित्वामुळे’ मनोहर परब यांनी मालवणी, प्रा. श्वेतल परब, स्नेहा कदम, कल्पना बांदेकर, दिलीप चव्हाण (कट्टा मालवण), कल्पना मलये, अंकुश कदम ‘फिरा माघारी, करा कूच ‘, लीलाधर घाडी, डॉ.शरयू आसोलकर ‘बाई ‘, प्रवीण ठाकूर, नीलम यादव, डॉ.गोविंद काजरेकर, प्रा. हर्षवर्धीणी सरदार , सरिता पवार , शालिनी मोहाळे, किशोर वालावलकर, प्रिया पारकर आदी कवींनी आपल्या कवितेतून कोजागरी संमेलन यशस्वी केले.प्रा. प्रविण बांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन तर कवी विठ्ठल कदम यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कवी संमेलनाची दाद देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए.बुवा, रमेश बोंद्रे, उषा परब, डॉ. मधुकर घारपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!