कोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोवा राज्यातून बेकायदेशीर रित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

*🎴सावंतवाडी :-* गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्या मार्गे बेकायदेशीर रित्या छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग कोल्हापूर यांनी कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या स्विफ्ट चारचाकीवर (एमएच ०४ डीएन ७८५४) धडक कारवाई करत एकूण ६ लाख ४४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी कोंडुरा गावाच्या हद्दीत कोंडुरं ते निरवडे या मार्गावर करण्यात आली.
या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूचे एकूण ५० बॉक्स जप्त करण्यात आले असून, गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (रा. वेंगुर्ला) याला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड येथे गोवा बनावटिची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी (एमएच ०१ व्हीए ५७४५) मधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारुचे ३ लाख ८ हजार ७६० असे एकूण १५ बॉक्स तसेच वापरण्यात आलेले चारचाकी असे एकूण ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी सुजय कन्हेया छेडा (गांधीनगर, कोल्हापूर) आणि शंकर विष्णुमल वाणी (कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर.जी. येवलुजे व के.डी. कोळी तसेच जवान सर्वश्री सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांनी केली.
पुढील तपास आर.जी. येवलुजे दुय्यम निरीक्षक व पी.आर. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर हे करीत आहेत.

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!