🛑 तिलारी धरणाच्या कालव्यांच्या दर्जाहीन कामांची उच्च स्तरावरून सखोल चौकशी होणे गरजेचे..
🛑 सर्व दर्जाहीन कामांना ठेकेदार व संबंधीत अधिकारी जबाबदार..
🛑 त्यामुळे किती निधी येतो व तो निधी कसा खर्च केला जातो हे माहित करून घेणे गरजेचे..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१९:- गेल्याकाही दिवसांपासून कालवा फुटीच्या प्रकरणामुळे जागोजागी तिच चर्चा सुरु असताना दिसत आहे. की कालवा दुरुस्तीसाठी वेळोवेळी कोट्यावधीचा निधी येत असताना देखिल कालव्याचे काम एवढे निकृष्ठ दर्जाचे होतेच कसे? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडलेला आहे.
दरवेळी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी येत असतो मात्र तो निधी कोणत्या प्रकारे वापरला जातो याकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र कालवा फुटी मुळे दरवर्षी शेतकऱ्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते.कधी त्या कालव्याच्या फुटीमुळे शेतकरी वाहून जातो, शेतकऱ्याची गुरेढोरे वाहून जातात , केलेले उत्पन्न वाहून जाते त्याचे अनेक प्रकारचे नुकसान कालव्यांच्या फुटण्यामुळे दरवर्षी होत असते.पण एवढे कोट्यावधी रुपये खर्च करूनही या सर्वांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असेल तर यासारखी शोकांतिका ती कोणती.या कालव्यांच्या फुटी मुळेशेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मात्र शेतकऱ्यांवर फुटीमुळे कोणतेही संकट ओढवले तर मात्र संबंधित अधिकारी आपले हात वर करतो.
कोट्यावधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम होत असते.मात्र त्याला कोणीही अडवत नाही.मात्र यामुळे ठेकेदाराची पोट भरणी मात्र सुरू असते.कालव्याच्या होणाऱ्या दर्जाहीन कामांना संबंधित ठेकेदार जबाबदार असतातच पण त्याप्रमाणे संबंधित अधिकारी देखील जबाबदार असतात. कारण ते ठेकदार करत असलेल्या कामांवर लक्ष देत नाहीत.त्यामुळे तिळारी धरणाच्या कालव्यांच्या दर्जाहीन कामांची उच्च स्तरावरून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता सामान्य शेतकरी करू लागला आहे.
तसेच शासनाकडून दिला जाणारा निधी दर वेळी किती असतो व तो कशा प्रकारे वापरला जातो हे माहीत करून घेणे गरजेचे आहे. या चर्चेला आता उधाण आले आहे.

