🛑 शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून एसटी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी..
_*🛑 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज सावंतवाडी आगार प्रमुख यांना देण्यात आले निवेदन..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* देशात त्याचप्रमाणे राज्यात कोरोना वैश्विक महामारी मुळे सन २०२१-२०२२ शैक्षणिक वर्ष उशिराने चालू होत आहे. दिनांक २ सप्टेंबर पासून इयत्ता १०वी/१२वी आणि 4 ऑक्टोंबर पासून ५वी/९वी/११वी चे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याच प्रमाणे उच्च शिक्षण वर्ग सुद्धा 20 ऑक्टोंबर पासून सुरु होत आहेत.
एक-दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे बंद असलेली एसटी बस सेवा सुद्धा आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे परंतु टाळेबंदीनंतर सुरु होणारी शाळा कॉलेजेस हे कोरोना चे नियम पाळून सुरू झाले असल्यामुळे शाळा-कॉलेजेस यांच्या वेळा या प्रत्येक वर्गवारीनुसार वेगवेगळ्या असल्याने आपल्या आगारातून सुटणाऱ्या बसच्या फेऱ्या यांच्या वेळा व शाळा कॉलेज यांच्या वेळा मध्ये काही ठिकाणी ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत.
म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने मार्फत आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत की आपण तालुक्यातील शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा या पूर्ण कालावधी पूर्वी जशा नियमित होत्या त्याचप्रमाणे करण्यात याव्यात ही विनंती सदर निवेदन हे मनविसे उपतालुका अध्यक्ष गोविंद मोरये मनीष पालव शुभम कोरगावकर अनुप सोनी आधी विद्यार्थी सेनेचे पदाधिकार्यांच्या वतीने देण्यात आले यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याअध्यक्ष संतोष भैरवकर लक्ष्मीकांत हरमलकर आदी उपस्थित होते.

